Karwa chauth 2023 esakal
लाइफस्टाइल

Karwa chauth 2023: लग्नानंतर पडून आहे वेडिंग लेहेंगा? मग करवा चौथला करा असा रिक्रिएट

नवीन लग्न झालेल्या सूवासिनी पहिल्या करवा चौथला लग्नातला लेहेंगा परिधान करतात.

Monika Lonkar –Kumbhar

Karwa chauth 2023 : करवा चौथचा सण जवळ आला आहे. १ नोव्हेंबरला हा करवा चौथचा सण देशभरातील सूवासिनींकडून साजरा केला जाईल. हा सण उद्यावर येऊन ठेपल्यामुळे महिला वर्गाची विविध प्रकारच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास करतात.

भारतातील उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र इत्यादी राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो. करवा चौथला महिला सूर्योदयापूर्वी सकाळी उपवास सुरू करतात आणि रात्री चंद्र पाहूनच हा उपवास सोडतात.

करवा चौथला महिला नवीन कपडे घालतात. नवीन साडी, ड्रेस, लेहेंगा इत्यादी अनेक ऑप्शन्स महिला ट्राय करतात. नवीन लग्न झालेल्या सूवासिनी त्यांच्या पहिल्या करवा चौथच्या व्रताला लग्नातला लेहेंगा देखील परिधान करतात. तुम्ही सुद्धा लेहेंगा घालणार असाल तर आज आम्ही काही स्टायलिंग टीप्स सांगणार आहोत. त्या नक्कीच फॉलो करा त्यासाठी हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा.

साडी लेहेंगा

करवा चौथला जर तुम्हाला तुमच्या लग्नातील लेहेंगा घालायचा असेल आणि तो पुन्हा स्टाईल करायचा असेल तर तुम्ही साडी लेहेंगा देखील ट्राय करू शकता. याचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या लग्नातील लेहेंग्याचा दुपट्टा साडीप्रमाणे स्टाईल करू शकता.

री-स्टिच करा

जर तुम्हाला तुमचा वेडिंग लेहेंगा पुन्हा स्टाईल करण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही तुमच्या लेहेंग्याचे कापड पुन्हा उसवून वेगळ्या प्रकारे शिवू शकता आणि स्टाईल करू शकता.

बेल्टचा वापर अवश्य करा

साडीसोबतच इतर प्रकारच्या एथनिक आऊटफीट्सवर बेल्ट स्टाईल करण्याचा ट्रेंड आला आहे. महिलांमध्ये तर याची प्रचंड क्रेझ आहे. तुम्ही देखील करवा चौथसाठी लेहेंग्यासोबत गोल्डन किंवा फॅब्रिक मॅचिंगचा बेल्टही छान प्रकारे स्टाईल करू शकता.

वेगळा ब्लाऊज करा स्टाईल

करवा चौथला जर तुम्ही तुमच्या लग्नातला वेडिंग लेहेंगा घालणार असाल तर त्याच्यासोबत मॅचिंग ब्लाऊज घालण्याऐवजी तुम्ही हटके ब्लाऊजचा पर्याय ट्राय करू शकता. यामुळे, तुमचा लूक छान खुलून दिसेल. शक्यतो कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज ट्राय करा. यामुळे, लेहेंग्याला हटके लूक मिळू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT