karwa Chauth sakal
लाइफस्टाइल

karwa Chauth 2023: या करवा चौथला लाल रंगाचे हे आऊटफिट्स ट्राय करा, दिसाल एकदम सुंदर

लग्नापासून कुठल्याही पार्टीत अगदी ग्लॅम पार्टीतही लाल रंगाचे कपडे आकर्षक वाटतात.

Aishwarya Musale

सणवार आले की बहुतेक स्त्रिया पारंपरिक पोशाख घालण्यास प्राधान्य देतात. सणासुदीच्या काळात तुम्ही एथनिक आऊटफिट्स वापरून पाहू शकता. हे आऊटफिट्स तुमच्या लुकमध्ये आकर्षकपणा आणण्यासाठी काम करतील. साध्या अनारकली कुर्त्यापासून साडीपर्यंत अनेक प्रकारचे आऊटफिट्स तुम्ही ट्राय करू शकता.

लाल रंगाला आपल्याकडे विशेष महत्व आहे. लग्नापासून कुठल्याही पार्टीत अगदी ग्लॅम पार्टीतही लाल रंगाचे कपडे आकर्षक वाटतात. त्यामुळे प्रत्येकीकडे एक तरी लाल रंगाचा कपडे असतातच. करवा चौथला लग्न झालेल्या महिला आवर्जून लाल रंगाचे कपडे घालतात.

या दिवशी लाल रंगाला विशेष महत्व आहे. त्यामुळे बाजारातही लाल रंगाचे कपडे मोठ्या प्रमाणावर दिसतात. तुम्हीही नेहमीच्या लाल रंगाच्या पोशाखाव्यतिरिक्त लाल रंगाचे वेगळे पर्याय यावेळी ट्राय करू पाहा.

रेड सीक्वेन साडी- पार्ट्यांमध्ये देखणे, आकर्षक दिसायचे असेल तर अनेकजणी सीक्वेन साडी नेसायला प्राधान्य देतात. यात लाल रंगाची साडी अधिक खुलून दिसते. ही साडी नेसताना काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवाव्यात. ही साडी स्लीवलेस ब्लाऊज, हाफ स्लीव्स ब्लाऊजवर अथिक खुलून दिसेल. त्यावर मोत्याचा चोकर किंवा हॅगिंग नेसलेस याने छान पेअर होईल.

लाल अनारकली ड्रेस- जर तुम्ही नोकरी करत असाल तर अनारकली ड्रेस हा बेस्ट पर्याय आहे. करवाचौथला अनेकजणी आजकाल अशाप्रकारचा ड्रेस घालतात. यात ड्रेसवर मॅच होणारी गोल्डन किंवा टेंपल ज्वेलरी घालता येईल.

रेड ड्रेसवर पलाझो- लाल रंगाच्या कुर्त्यावर गोल्डन किंवा क्रीम कलरचा पलाझो घालता येऊ शकतो. यामुळे तुमचा लूक जरा हटके होईल. यावर तुम्ही हलकासा मेकअप केलात तर आणखी उठून दिसाल. मोत्याची माळ तुमच्या व्यक्तीमत्वाला आणखी शोभा देईल.

लॉंग एथनिक रेड जॅकेट- आजकाल साडी, ड्रेसवर जॅकेट वापरण्याचा ट्रेंड आहे. जर तुम्ही वेगळ्या कलरचा कुर्ता वापरणार असाल, त्यावर काही वेगळे प्रयोग करण्याची इच्छा असेल तर तुम्ही जॅकेट वापरून पाहा. यासाठी एथनिक रेड जॅकेट हा एक चांगला पर्याय आहे. यावर तु्म्ही बेल्टही लावू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, ८ प्रभागांची नावे बदलली

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT