Monsoon  sakal
लाइफस्टाइल

Monsoon Disease: पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी या गोष्टी ठेवा लक्षात

पावसाळा एन्जॉय करायचा असेल तर आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

Aishwarya Musale

पावसाळा हा वर्षातील सर्व ऋतूंमध्ये सर्वात सुंदर मानला जातो. सुंदर असण्यासोबतच पावसाळा काही आव्हानेही घेऊन येतो. या पावसाळ्यात संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे व्हायरल फीवर, खोकला, सर्दी अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

हवेतील आर्द्रतेमुळे संसर्ग लवकर होतो. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे या ऋतूत शरीरातील चयापचय क्रिया वाढवण्यासाठी सकस आणि पौष्टिक आहार घेणे फायदेशीर ठरते. पण आपल्या रोजच्या काही सवयी बदलूनही पावसाळ्यात होणारे आजार टाळता येतात.

हाइजीन

पावसाळ्यात स्वच्छतेची काळजी जरूर घ्या. आपले हात साबणाने आणि पाण्याने वारंवार धुवून चांगली स्वच्छता राखा. जंतूंचा प्रसार रोखण्यासाठी घाणेरड्या हातांनी आपल्या चेहऱ्याला स्पर्श करणे टाळण्याचा प्रयत्न करा.

पिण्याच्या पाण्याची काळजी घ्या

पाण्यात जास्तीत जास्त जंतू पसरण्याचा धोका असतो. नेहमी फक्त सुरक्षित आणि स्वच्छ पाणी प्या. पावसाळ्यात फिल्टर केलेले किंवा उकळलेले पाणी प्या. रस्त्यावरचे अन्न किंवा दूषित पाण्यात धुतलेल्या कच्च्या भाज्या खाणे टाळा.

साठवलेले अन्न खाऊ नका

पावसाळ्यात जास्त आर्द्रता असल्याने अन्न लवकर खराब होते. म्हणूनच नेहमी ताजे अन्नच खावे. साठवलेले किंवा शिळे अन्न खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. याआधी फळे किंवा भाज्या चांगल्या प्रकारे धुवाव्यात.

डास

पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियासारखे आजार पसरण्याचा धोका जास्त असतो. डास चावण्यापासून वाचण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घाला आणि मच्छरदाणीखाली झोपण्याचा प्रयत्न करा. याशिवाय आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि कोणत्याही प्रकारचे पाणी साचू देऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : २२ वर्षीय प्रियाची पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा अन् सुवर्णपदक... शेतकऱ्याच्या लेकीने इतिहास घडवला

Deportation Rule: राष्ट्रीयत्वाची खात्री झाल्याशिवाय हकालपट्टी नाही; सर्वोच्च न्यायालयात केंद्राची भूमिका, निर्वासनासाठी ३ अटी अनिवार्य

Commonwealth Games 2026 : साक्षी चौधरीचा गोल्डन पंच; भारतीय सैन्यात असलेल्या पोरीने जग जिंकलं! ज्युदोत उन्नतीची कांस्य क्रांती

IND vs SL : श्रीलंकेचा रडीचा डाव! भारतीय संघाला पुरेसा सराव मिळू नये म्हणून लढवली शक्कल; नेमकं काय घडलं?

Teacher Salary: ई-केवायसीशिवाय ऑगस्टचे वेतन नाही; शिक्षण संचालकांचा कडक आदेश, मुदतवाढीला स्पष्ट नकार

SCROLL FOR NEXT