Keratin Treatment At Home esakal
लाइफस्टाइल

Keratin Treatment At Home : केराटिन ट्रिटमेंटवर हजारो रूपये कशाला घालवता? शिळा भात आहे की, तो करेल केस स्मूथ!

keratin treatment at home: केराटिनचे फायदे काय आहेत?

Pooja Karande-Kadam

Keratin Treatment At Home : डल आणि डॅमेज केस कोणालाही आवडत नाहीत. अशा परिस्थितीत केसांना नैसर्गिक पद्धतीने सुंदर बनवण्यासाठी महिला केराटिन ट्रीटमेंट करून घेतात. ही एक खूप कॉमन हेअर ट्रीटमेंट आहे, जे केल्यानंतर कोरड्या आणि खराब झालेल्या केसांची शाइन परत येते. पण प्रत्येक वेळी पार्लरमध्ये जाऊन ही हेअर ट्रीटमेंट करणे तुमच्या खिशाला परवडण्यासारखे नाही.

प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिचे केस रेशमी आणि उछालदार दिसावेत. ज्यासाठी ती हजारो रुपये खर्च करून केराटीन करून घेते. महिला त्यांचे केस सुधारण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात, परंतु या उपचारांचा प्रभाव काही काळच टिकतो. (Keratin Treatment At Home : Bring shine to your hair with stale rice, learn how to make keratin hair mask at home)

आज आपण अशी ट्रिंटमेंट पाहणार आहोत, जी तुम्ही भाताचा वापर करून करू शकता. जर तुम्हाला रेशमी, चमकदार, बाउंसी केस हवे असतील तर महिन्यातून किमान दोनदा घरी हे करा. तांदूळ केराटिन हेअर मास्क तुमच्या केसांना एकही पैसा खर्च न करता नवीन जीवन देईल.

केसांच्या उपचारासाठी पुष्कळ पैसा वारंवार खर्च केला जातो, त्या बदल्यात केसांना अनेक रसायने सहन करावी लागतात. त्यामुळे केस अधिकच डॅमेज होतात. घरीच शिळा भात अन् भेंडीपासून केराटिन हेअर मास्क कसा बनवायचा ते पाहुयात.

केराटिनचे फायदे काय आहेत

  1. ज्या लोकांचे केस गळायला लागतात त्यांच्यासाठी केराटिन उपचार खूप फायदेशीर आहे.

  2. ज्या लोकांचे केस पावसाळ्यात कोमेजून जातात. केराटिन ट्रीटमेंटमुळे त्यांच्या केसांना नवजीवन मिळते.

  3. केराटिन ट्रीटमेंटमुळे केस मऊ होतात.

  4. केराटिन ट्रीटमेंटमुळे केस मुळांपासून मजबूत होतात. ज्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते. (Hair Care)

घरी केराटिन हेअर मास्क कसा बनवायचा?

  1. शिळा भात - एक वाटी

  2. 1 अंड्याचा पांढरा

  3. नारळ तेल - अर्धा टीस्पून

  4. ऑलिव्ह तेल - 1 टीस्पून (Olive Oil)

केराटिन हेअर मास्क कसा बनवायचा

केराटिन हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात शिळा तांदूळ टाका आणि त्याची पेस्ट होईपर्यंत हाताने मॅश करा. या तांदळाच्या पेस्टमध्ये 1 अंड्याचा पांढरा भाग घाला आणि नंतर चांगले मिसळा. आता त्यात ऑलिव्ह ऑईल आणि खोबरेल तेल घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा. तुमचा हेअर मास्क तयार आहे.

  • भेंडीचा हेअरमास्क कसा करायचा?

  • प्रथम भिंडी पाण्याने नीट धुवून त्याचे छोटे तुकडे करावेत.

  • आता एका पॅनमध्ये पाणी गरम करा आणि उकळत्या पाण्यात चिरलेली भेंडी घाला आणि १० मिनिटे उकळवा.

  • भेंडीचा रस पाण्यात पूर्णपणे विरघळल्यावर गॅस बंद करा.

  • आता पाणी आणि भेंडीच्या पाण्याचे मिश्रण बारीक करा.

  • ही पेस्ट एका बारीक सुती कापडावर ओतून चांगली गाळून घ्या.

  • त्यानंतर एक अतिशय गुळगुळीत आणि मऊ पेस्ट तुम्हाला मिळेल.

  • आता एका भांड्यात कॉर्न स्टार्च घ्या. त्यात पाणी घाला आणि द्रावण तयार करा.

  • या पेस्टमध्ये नारळ आणि बदाम तेल मिसळा. या मिश्रणात भेंडीचे मिश्रण घाला.

  • तुमची केराटिन ट्रीटमेंट क्रीम तयार होईल. (Hair Care Treatment)

केराटिन ट्रिटमेंट आधी हे करा

तांदूळ केराटिन हेअर मास्क लावण्यापूर्वी आपले केस शॅम्पू करा आणि पूर्णपणे कोरडे करा.

हेअर मास्क कसा लावाल?

आता हा तांदूळ आणि भेंडीचा पॅक केसांना लावा आणि 40 ते 50 मिनिटे राहू द्या. आपण आपले केस शॉवर कॅपने झाकून ठेवू शकता. 40 मिनिटांनंतर केस साध्या पाण्याने सौम्य शाम्पूने धुवा. केस कोरडे केल्यावर, तुम्हाला चमक आणि उसळी दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT