Relations Sakal
लाइफस्टाइल

नातीगोती : सर्वांना समान वागणूक द्या!

मला असं वाटतं, की कुटुंबव्यवस्थेचा भक्कम पाया मैत्रीचा असला पाहिजे.

सकाळ वृत्तसेवा

- खुशबू तावडे

मला असं वाटतं, की कुटुंबव्यवस्थेचा भक्कम पाया मैत्रीचा असला पाहिजे. कुटुंबव्यवस्थेतल्या मूळ दोन व्यक्ती म्हणजे आई-बाबा किंवा पती-पत्नी ज्यांच्यापासून ते कुटुंब सुरू होतं, त्या दोघांमध्ये अत्यंत घट्ट मैत्री असणं खूप गरजेचं आहे. कारण, मला असं वाटतं की वर्षानुवर्षं मैत्री टिकते आणि काळानुसार मजबूत होते. त्यांचं नातंही तितकंच अतूट होतं.

माझ्या कुटुंबातली माझी जवळची व्यक्ती म्हणजे माझे वडील. ते माझ्या सगळ्यात जवळचे आहेत. त्यांचे आवडते गुण म्हणजे समोरच्याचं ऐकून घेणं. ते एकदम उत्तम श्रोते आहेत. पप्पांना कोणतीही गोष्ट विचारू शकतो. त्यावेळी ते समोरच्या व्यक्तीची बाजू पूर्णपणे ऐकल्यावर त्यांना मित्रासारखा सल्ला देतात. मला अनेक हृद्य प्रसंग आठवतात.

प्रत्येक वेळी जेव्हा मी चाकोरीबाहेर जाऊन काही करायचा विचार केला, जिथं समाजाचा दबाव येऊ शकत होता आणि ‘ती गोष्ट करू का नको?’ या विचारात मी पडले होते, तेव्हा माझे पप्पा ठामपणे माझ्यासोबत उभे राहिले आहेत. 

आमच्या कुटुंबाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जण शांत डोक्याचा आहे. एक जण बोलत असेल, तर दुसरा व्यक्ती मध्ये बोलत नाही. जो बोलत असेल त्याचं पूर्ण बोलणं ऐकून घेतात. सगळ्यांना समान वागणूक असते आणि घरातल्या प्रत्येक सदस्याला कुटुंब प्राधान्य देतं, हे आमच्या कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे.

सध्या मी ‘झी मराठी’ या वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत उमाची भूमिका साकारत आहे. चित्रीकरणामुळे मी व्यग्र असते. मात्र, प्रत्येक सणाला आम्ही एकत्रच असतो किंवा कोणाचा महत्त्वाचा दिवस असेल, जसे की वाढदिवस, पगाराचा दिवस.

त्या दिवशी आम्ही सर्व एकत्र येऊन तो साजरा करायचा प्रयत्न करतो. यात भर घालायची झाली, तर आम्ही एकत्र आलो की आमची खाण्याची चंगळ असते. आम्ही सर्वजण खवय्ये असल्याने घरात एखादा पदार्थ बनतो किंवा बाहेरून काही मागवलं जातं आणि हे चालू असताना प्रचंड गप्पा मारल्या जातात.

मी गरोदर होते आणि जेव्हा मला बाळ झालं तेव्हाच्या संपूर्ण काळात माझ्या कुटुंबानं मला साथ दिली, ती मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. मी जेव्हा पुन्हा अभिनयात करिअर करायचा विचार केला, तेव्हाही माझं कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं. या दोन प्रसंगांमुळे मला माझ्या कुटुंबाचं महत्त्व लक्षात आलं.

नातेसंबंध चांगले होण्यासाठी मी भावनिक रूपात त्यांच्यासाठी उपलब्ध राहते, कारण भौतिकरीत्या उपलब्ध होण्याचा प्रयत्न सर्वांचा असतो; पण नेहमी ते शक्य नाही होत. पण ज्यावेळी एखाद्या सदस्याला भावनिक रूपात गरज असते, तेव्हा मी उपलब्ध राहते.

नाती दृढ होण्यासाठी...

  • कुटुंबव्यवस्थेवर विश्वास ठेवा.

  • कुटुंबाला नेहमी प्राधान्य द्या.

  • आपल्या कुटुंबासोबत मानसिक रूपात उपलब्ध राहा.

  • जेव्हा कुटुंबातील सदस्य आपल्या जवळ असतील, तेव्हा फोनपासून दूर राहा.

  • महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, तुम्ही जितके सुदृढ राहाल, तितकं तुमचं कुटुंब सुदृढ राहील.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT