Cute Name Kiara  esakal
लाइफस्टाइल

Cute Name Kiara : कियारासारखंच क्यूट तिचं नाव, अर्थ माहितीये? तुमच्या बाळासाठीही ठेवू शकता ही नाव

तुम्ही तुमच्या मुलीसाठी हे नाव ठेवू शकता

साक्षी राऊत

Cute Baby Girl Name : सिद्धार्थ आणि त्याच्या प्रेमाची कळी कियारा दोघेगी रोझ डे च्या दिवशी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाबरोबरच सध्या सोशल मीडियावर तिच्याप्रमाणे असणाऱ्या तिच्या क्यूट नावाचीही चर्चा सुरुये. या नावाचा अर्थही फार सुंदर आहे. तुम्ही तुमच्या मुलीसाठी हे नाव ठेवू शकता. सोबतच आणखी काही नावांची लिस्टही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कियारा नावाचा अर्थ काय आहे?

कियारा हे इटालियन, कोरियन, ऑस्ट्रेलियन, आयरिश नाव आहे. कियारा नावाचा अर्थ "हलका, स्पष्ट आणि दयाळू" आहे. कियारा अडवाणी देखील तिच्या नावाप्रमाणेच आहे. आता खाली काही मुलींची नावे आहेत ज्यांचा अर्थ फार अर्थपूर्ण आहे.

आणखी काही क्यूट नावं

दिया

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाला तुम्ही ओळखतच असाल. दिया नावाचा अर्थ "दिवा, अलौकिक, दिवस आणि प्रकाश" असा आहे. तुम्ही तुमच्या छोट्या एंजलला दिया नाव देऊ शकता. ज्या प्रकारे दिवा पेटतो, त्याच प्रकारे तुमची मुलगी देखील तुमच्या आयुष्यात प्रकाश आणेल.

अर्का

जर तुमच्या मुलीचे नाव 'A' अक्षरावरून आले असेल तर तुम्ही तिचे नाव अर्का ठेवू शकता. अर्का हे अनोखे नाव असून ते क्वचितच पाहायला मिळते. अर्का नावाचा अर्थ लाइटनिंग, सूर्य, प्रकाश किरण आणि मित्र असा होतो.

मायरा

मायरा नावाचा अर्थ जलद आणि प्रकाश, अद्भुत, प्रसन्न गाणे, मध, प्रिय, फुलपाखरू, देवाची अनमोल भेट, दैवी मौल्यवान, चंद्र, प्रकाश, मोर, प्रशंसनीय आणि थोर स्त्री असा होतो. हे नाव जरी स्टायलिश वाटत असलं तरी त्याचा अर्थ फारच सुसंस्कृत आहे.

नीवा

जर तुमच्या मुलीचे नाव 'N' अक्षरावरून आले असेल तर तुम्ही तिचे नाव नीवा ठेवू शकता. नीवा म्हणजे सूर्य, आलिंगन, नूतनीकरण, प्रकाश, आणि ज्ञान. तुम्हाला तुमच्या लहान मुलीसाठी हे अनोखे नाव आवडेल. (Baby Girl)

यामी

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला तुम्ही ओळखतच असाल. यामी म्हणजे अंधारात प्रकाश, चमकणारा तारा, सुंदर, यमुना नदी. तुम्ही तुमच्या लहान मुलीसाठी हे गोंडस नाव निवडू शकता.

लीना

जर तुमच्या मुलीचे नाव 'L' अक्षरावरून आले असेल तर तुम्ही तिच्यासाठी लीना हे नाव निवडू शकता. लीना नावाचा अर्थ एक भक्त, नाजूक, प्रकाश, मुक्त माणूस, ताडाचे झाड, ओले कुरण, स्त्री, कोमल, प्रकाश, क्षमा आणि प्रकाशाची मशाल असा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकण रेल्वेच्या शिल्पकाराला मानाचा मुजरा! सावंतवाडी स्टेशन ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ होणार; सरकारचा मोठा निर्णय

Monsoon Arrival Maharashtra : मॉन्सून आगमनाची तारीख बदलली, ८ ते १० जूनदरम्यान महाराष्ट्रात पाऊस; शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढणार

‘चक दे इंडिया’ फेम रमाकांत दायमा यांचं निधन, आठवणीत कलाकार भावूक, चाहत्यांना धक्का

Latest Marathi News Live Update : जाचक अटी आणि ए ग्रेडच्या निकषामुळे शेतकऱ्यांना नाफेडला कांदा विकण्यात अडचणी

Farmers Gold Loan : खरिपाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांवर घरातील सोनं तारण ठेवण्याची वेळ; बँकांच्या कारभाराने भ्रमनिरास, कांद्यालाही मिळेना भाव!

SCROLL FOR NEXT