salt and sugar sakal
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: पावसाळ्यात साखर, मिठाला सुटलं पाणी; या छोट्या टीप्स नक्की करा फॉलो

एवढेच नाही तर पावसाळ्यात घरातील तसेच बाहेरील वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

Aishwarya Musale

पावसाळा आल्हाददायक वाटत असला तरी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाईट परिस्थितीही निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर पावसाळ्यात घरातील तसेच बाहेरील वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या ऋतूमध्ये आर्द्रता वाढल्याने घराच्या भिंती, खिडक्या, दरवाजे ओलाव्यामुळे खराब होऊ लागतातच, शिवाय स्वयंपाकघरात ठेवलेले खाद्यपदार्थ आणि मसालेही खराब होतात.

कधीकधी साखर आणि मीठ देखील ओले होते. हे त्यांच्यामध्ये आर्द्रतेच्या उपस्थितीमुळे होते. चिकट साखर टाकून काही बनवावेसेही वाटत नाही. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल आणि स्वयंपाकघरात ठेवलेली साखर आणि मीठ ओले झाले असेल तर या किचन हॅकची मदत घ्या. तुमची ही समस्या काही मिनिटांत दूर होईल.

साखर, मीठ पासून ओलावा दूर ठेवण्याचे 5 मार्ग

1. बर्‍याचदा पावसाळ्याच्या दिवसात वातावरणातील आर्द्रता वाढल्याने साखरेला पाणी सुटते. त्यामुळे साखरेची चवही खराब होते. अनेक वेळा लोक ते वापरत नाहीत. तुम्ही साखरेच्या पेटीत ७ ते ८ लवंगा टाका. कापडात बांधूनही ठेवू शकता. यामुळे साखरेत ओलावा राहणार नाही आणि ती ताजी आणि कोरडीही राहील.

2. ज्या बॉक्समध्ये साखर ठेवली जाते त्याचे झाकण जर सैल असेल तर साखरेमध्ये ओलावा असू शकतो. साखर किंवा मीठ चांगल्या डब्यात ठेवा. मीठ आणि साखर ठेवण्यासाठी काचेचे कंटेनर किंवा भांडे वापरा. यामुळे ओलावा होणार नाही आणि ते कोरडे राहतील.

3. अनेकदा लोक ओल्या हाताने किंवा चमच्याने साखर बाहेर काढतात. असे करू नका अन्यथा पाण्यामुळे ओलसर होऊ शकते. साखर फक्त कोरड्या चमच्याने घ्या. यातून स्वच्छताही राखली जाणार आहे. साखर बाहेर काढल्यानंतर झाकण नेहमी घट्ट बंद करा.

4. तुम्ही ज्या भांड्यात साखर किंवा मीठ ठेवता त्या भांड्यात तांदळाचे काही दाणे कापडात बांधून ठेवा. तांदूळ ओलावा शोषून घेण्याचे कार्य करू शकतो. यामुळे पावसाळ्यातही ते कोरडे राहतील.

5. साखरेच्या भांड्यात दालचिनीचा तुकडा टाकून ठेवा. तुम्ही मीठ मध्ये ही पद्धत वापरू शकता. यामुळे दालचिनीचा सुगंधही त्यात जाईल आणि ओलावा न होता कोरडा राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Kalyan Crime : ६ महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या २५ वर्षीय लेकीची हत्या, वडिलांवरच संशय; काय घडलं?

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

SCROLL FOR NEXT