Kitchen Hacks 
लाइफस्टाइल

कापून ठेवलेलं सफरचंद तपकिरी होऊ नये म्हणून काय कराल?, जाणून घ्या किचन टिप्स

आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

स्वयंपाक करत असताना अनेक सोप्या ट्रिक्स वापरल्या जातात. पाककलेतील शॉर्टकट हे काम आणखी सोपे करण्यासाठी उपयोगी पडतात. विशेषत: तुम्हाला काहीवेळा एखाद्या कामात घाई असेल तर तुम्ही या टिप्स वापरू शकता. स्वयंपाकघरातील अशा अनेक टिप्स तुमचे काम सोपे करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे काम सोपे होईल. चला तर मग जाणून घेऊ काही उपयुक्त टिप्स खालीलप्रमाणे...

किचन टिप्स -

  • भाज्या सोलण्यापूर्वी किंवा चिरण्यापूर्वी धुवाव्यात. कापल्यानंतर भाज्या धूवु नयेत.

  • बटाटे आणि वांगी चिरल्यानंतर पाण्यात भिजत ठेवा. जेणेकरून त्यांचा रंग खराब होणार नाही. किंवा ती काळी पडणार नाहीत.

  • भाज्या पाण्यात उकळल्यानंतर ते पाणी फेकून देऊ नका, त्याचा वापर त्या भाजीच्या ग्रेव्ही बनवण्यासाठी करा.

  • सफरचंद कापल्यानंतर ते तपकिरी होऊ नये म्हणून कापलेल्या भागावर थोडासा लिंबाचा रस लावा. त्यामुळे सफरचंद अधिक काळ टिकेल आणि ताजेतवानेही दिसेल.

  • फ्रिजमध्ये मलमली किंवा सुती कापडाच्या पिशवीत कोथिंबीर ठेवा. यामुळे ती अधिक काळ ताजी, टवटवीत राहील.

  • हिरव्या मिरच्यांचे देठ काढून टाका, यामुळे हिरवी मिरची जास्त काळ टिकेल.

  • कांदा सोलल्यानंतर तो अर्धाच कापून घ्या आणि चिरण्यापूर्वी सुमारे 10 मिनिटे पाण्यात भिजवा. जेणेकरून कांदा चिरताना तुमच्या डोळ्यातून पाणी येणार नाही.

  • एक कप उकळत्या पाण्यात बदाम 10 मिनिटे भिजत ठेवा. यामुळे त्याची साल सहज निघून जाईल आणि त्याचा वापर करता येईल.

  • धारदार चाकू आणि लाकडी चॉपिंग बोर्ड वापरून भाज्या चिरणे सोपे आहे.

  • संगमरवरी स्लॅबवर कापल्याने तुमच्या चाकूची धार खराब होण्याची शक्यता असते.

  • फळे आणि भाज्या जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी, फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी त्यांना वर्तमानपत्रात गुंडाळा.

  • वाळलेल्या फळांचे तुकडे करण्यापूर्वी तासभर गोठवून ठेवा आणि नंतर कापण्यापूर्वी चाकू गरम पाण्यात बुडवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Dombivali News : दिवा स्वतंत्र पोलीस ठाण्याचा विषय मार्गी लावा; मनसे नेते राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

SCROLL FOR NEXT