Kitchen Hacks Sakal
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: रवा जास्त काळ कसा साठवायचा? वाचा एका क्लिकवर

Kitchen Hacks: जर तुम्हाला घरी रवा जास्त दिवस टिकवून ठेवायचा असेल तर पुढील घरगुती गोष्टींचा वापर करू शकता.

Puja Bonkile

Kitchen Hacks how to preserve rava for long time

स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ असतात जे नीट स्टोअर केले नाही तर खराब होऊ शकतात. तर असे अनेक पदार्थ आहेत ज्यांना लवकर किड लागते. तुम्हाला रवा जास्त दिवसांसाठी स्टोअर करायचा असेल तर काही घरगुती उपाय करू शकता. रवा उघडा ठेवणे किंवा त्यात ओलावा आल्याने खराब होऊ शकतो. रवा खराब झाला म्हणून फेकून न देता तुम्ही पुढील पद्धतींचा वापर करून स्वच्छ देखील करू शकता.

  • कापुर

रव्यातील किड लागू नये यासाठी कापुरचा वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात रवा घेऊन त्यावर वर्तमानपत्र पसरावे. कापुरचे तुकडे वर्तमानपत्रावर टाकावे. अर्ध्या तासानंतर सर्व किडे निघून जातील. तुम्ही नंतर रवा चाळणीने गाळून वापरू शकता.

  • कडुलिंबाची पानं

रवा जास्त दिवस स्टोअर करायचा असेल तर तुम्ही त्यात कडुलिंबाची पानं टाकू शकता. यासाठी 10-12 कडुलिंबाची पाने स्वच्छ करून रवा ज्या डब्ब्यात त्यात ठेवावे. कडुलिंबाच्या पानात पाणी नसावे हे लक्षात ठेवावे. रवा वापरण्यापुर्वी चाळणीने गाळून घ्यावा.

  • उन्हात ठेवावे

रव्यामध्ये किडे लागले असेल तर सर्वात पहिले चाळणीच्या मदतीने नीट गाळून घ्यावे. नंतर थोडावेळ उन्हात ठेवावे. असे केल्याने रव्यातून किडे निघून जातील. उन्हात रवा ठेवल्यावर हाताने रवा हाताने पसरवा. यामुळे किडे बाहेर निघून जातील. यानंतर पुन्हा एकदा रवा गाळून घ्यावा.

  • रवा भाजून ठेवावा

रवा जास्त दिवसांसाठी स्टोअर करण्यासाठी तुम्ही भाजून ठेऊ शकता. यामुळे रव्यात किड लागणार नाही.

  • रवा स्टोअर करण्यासाठी इतर टिप्स

रवा योग्य स्टोअर केला नाही तर तो खराब होतो.

सर्वात आधी ज्या डब्ब्यात रवा ठेवणार आहात त्याचे झाकण टाइट लावावे.

रव्याला नेहमी काचेच्या हवा बंद डब्ब्यात ठेवावे.

तुम्ही रवा फ्रिजमध्येही ठेऊ शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT