Almond Peel Benefits Sakal
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: चटणीपासून फेस पॅक बनवण्यापर्यंत बदामाच्या सालीचा असा करू शकता वापर

Almond Peel Benefits: तुम्ही भिजवलेले बदाम खाऊन त्याची साल फेकून देत असाल तर अशी चूक करू नका. कारण या सालींचा वापर अनेक घरगुती कामांसाठी करू शकता.

Puja Bonkile

Kitchen Hacks: तुम्हीही भिजवलेल्या बदामाची साले फेकून देत असाल तर असे करू नका. कारण खराब वाटणारे हे साल तुमच्या कामात येऊ शकते. तुम्ही या सालींचा वापर करून जेवणाची चव आणि तुमची त्वचा चमकदार बनवू शकता. बदामाच्या सालीमध्ये जीवनसत्वे, खजिने आणि अँटी-ऑक्सिडंट असतात. या सालींचा वापर करून तुम्ही हेअर मास्क आणि चविष्ट चटणीही तयार करू शकता. बदामाच्या सालींचा आणखी कशा प्रकारे वापर करू शकतो हे जाणून घेऊया.

चटणी

बदामाच्या सालीपासून बनवलेली चटणी स्वादिष्ट तर असतेच शिवाय पौष्टिकतेनेही भरपूर असते. ही चटणी बनवण्यासाठी एक वाटी बदामाची साले, एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी उडीद डाळ तुपात भाजून घ्यावे. यानंतर या सर्व गोष्टी थंड करून त्यात लसूण, हिरवी मिरची, आलं, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून बारीक करून घ्या. आता दुसऱ्या भांड्यात तूप गरम करून त्यात कढीपत्ता, मोहरी आणि लाल मिरच्या घालून फोडणी तयार करा. तुमची चवदार बदामाच्या सालीची चटणी तयार आहे.

फेस पॅक

तुम्हाला तुमच्या त्वचेला चमकदार बनवायचे असेल तर बदामाची साल तुम्हाला मदत करू शकते. या सालींमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई त्वचेला सुधारण्यास मदत करतात. हा फेस पॅक बनवण्यासाठी बदामाची साले बारीक करून त्यात थोडे मध घालून २० मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावे.

झाडांसाठी खत

बदामाच्या सालीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असता. जे झाडांच्या वाढीस मदत करतात. यासाठी बदामाची साले उन्हात वाळवा, बारीक करून त्याची पावडर तयार करा. आता एक चमचा ही पावडर आठवड्यातून एकदा पाण्यात मिक्स करून झाडांच्या मुळांमध्ये घाला. झाडे हिरवीगार होतील.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT