Kitchen Tips  esakal
लाइफस्टाइल

Kitchen Tips : बघेल तिकडे मुंग्यांचा ढिगारा, तर या टिप्स वापरा, मुंग्या घरात पाऊल टाकणार नाहीत!

घरातून मुंग्यांना पळवून लावण्यासाठी लिंबू प्रभावी ठरू शकतो

सकाळ डिजिटल टीम

Kitchen Tips :

उन्हाळ्याला सुरूवात झाली की घरात एका पाहुण्यांचे आगमन होते. ते पाहुणे आपल्याला नकोसे असतात. कारण ते नकोसे असलेले पाहुणे म्हणजे मुंग्या असतात. उन्हाळ्यात सर्वांच्याच घरात मुंग्या हजेरी लावतात.

काहीवेळा चावतात, काहीवेळा एखाद्या पदार्थावर मोर्चा काढतात. तर काहीवेळा संपूर्ण साखरेच्या डब्यालाच घर करून बसतात. लहानगी मुलं मुंग्याकडे न पाहताच घरभर वावरतात, त्यामुळं कधी कधी या मुंग्या मुलांच्या शरीराचा चावा घेतात.  

त्यामुळेच यंदाच्या उन्हाळ्यात मुंग्यांचा घरभर सुळसुळाट होतो. त्यावर काही उपाय केले तर मुंग्या घरातून कायमच्या निघून जातील.  

प्रभावी ठरेल लिंबू

घरातून मुंग्यांना पळवून लावण्यासाठी लिंबू प्रभावी ठरू शकतो. ज्या ठिकाणी मुंग्या जास्त असतील त्या ठिकाणी थोडासा लिंबाचा रस पिळावा. यामुळे मुंग्या दूर होतील.

मीठाचा वापर करा

मुंग्यांना मीठ अजिबात आवडत नाही, जिथे जास्त मुंग्या असतील तिथे थोडं मीठ शिंपडा, ते बघून त्या पळू लागतात. जिथे मुंग्या येतात तिथे तुम्ही फ्लाय पेपर देखील लावू शकता.

कडुलिंबाचे तेल

याशिवाय जिथे मुंग्या येतात तिथे कडुलिंबाचे तेल लावा, यामुळे मुंग्या घरात येण्यापासून घाबरतील. ते कडुलिंबाच्या तेलाच्या वासापासून दूर पळतात.तुम्ही तिखट शिंपडून मुंग्या घालवू शकता.

लवंगाचे तेल

पाण्यात लवंगाचे तेल मिसळा आणि जिथे मुंग्या येतात तिथे फवारणी करा. याशिवाय बेकिंग सोडा आणि साखर यांचे मिश्रण बनवून मुंग्या असलेल्या ठिकाणी लावा. (Kitchen Hacks)

कापूर 

मुंग्या येतात तिथे कापूरचे तुकडे ठेवा. या सर्वांशिवाय मुंग्यांना मारण्यासाठी बाजारात अनेक औषधे आणि स्प्रे उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही मुंग्यांना सहज दूर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT