Kitchen Tips esakal
लाइफस्टाइल

Kitchen Tips : भांडी घासू नका फक्त धुवा; कोणत्याही कष्टाशिवाय भांड्यावरचे तेलकट डाग घालवण्याचा सोप्पा फॉर्म्युला

डबे अन् त्यांची झाकणं, मोठ्या कढया साफ करायला त्या तासंतास घासत बसावं लागतं

Pooja Karande-Kadam

Kitchen Tips : दिवाळीच्या आधीच महिलावर्गाने साफसफाई केली असेल. भांडी-कुंडी स्वच्छ लखलखीत करून ठेवली असतील. पण असं प्रत्येकालाच जमत नाही. काही वर्किंग वुमन्स तर दिवाळीच्या आधल्या दिवशी सफाईला हात लावतात.

तुम्हीही अगदी शेवटच्या दिवशी सफाई करत असाल तर वेळ, पैसा वाचवणारी एक ट्रिक तुम्हाला सांगतो. तुम्ही मोठे-मोठे स्टीलचे डबे स्वच्छ करणार असाल तर त्यावर जास्त मेहनत न घेता डबे लखलखीत कसे करायचे हे पाहुयात.

डबे अन् त्यांची झाकणं, मोठ्या कढया साफ करायला त्या तासंतास घासत बसावं लागतं. भांडी घासून हातही बोथट होतात. त्यामुळे तुम्हालाही हातांची काळजी घ्यायची असेल. तर, ही एक ट्रिक नक्की करून बघा.

साहीत्य – पाणी, सोडा, लिंबू आणि वॉशिंग पावडर

एका मोठ्या टबमध्ये संपूर्ण डबा बुडेल इतके पाणी घ्या. आता या पाण्यात एक लिंबू, १ चमचा सोडा अन् वॉशिंग पावडर टाका. आता या पाण्याचा हातानेच फेस बनवा.

त्यानंतर एक एक डबा या पाण्यात बुडवा आणि त्यावर फक्त कापड फिरवा. जसे तुम्ही कापड फिरवाल तसे भांड्यांचे डाग निघून जातील.

छोटी भांडी असतील तर अशा पाण्यात टाकून ठेवा आणि थोड्यावेळाने फक्त धुवून घ्या. म्हणजे ती लख्ख निघलेली दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT