kitchen tips  esakal
लाइफस्टाइल

Kitchen Tips : लाटणं स्वच्छ करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहितीय का?

सणावाराला जास्त स्वयंपाक केला तर पोळपाट लाटणं स्वच्छ केलं जातं. पण, इतरवेळी...

Pooja Karande-Kadam

Kitchen Tips :

स्वयंपाकघरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूची अत्यंत बारकाईने स्वच्छता आणि काळजी घेणे आवश्यक आहे. असे न केल्यास या वस्तूंवर लागलेली घाण थेट तुमच्या शरीरात पोहोचते, ज्यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. अनेक गंभीर आजारही या घाणीमुळे होऊ शकतात.

पोळपाट आणि लाटणे हे प्रत्येकाच्याच घरी असतं. पोळपाटावर चपात्या गोलाकार छान येतात. घरी बनवलेल्या चपात्या आपल्यासाठी पौष्टीक असतात. जवळजवळ प्रत्येक घरात चपात्या बनवण्यासाठी लाटणे आणि पोळपाट वापरले जाते. पण अनेक महिला त्याची योग्य देखभाल करत नाहीत.

तसेच ते साफ करण्याच्या योग्य पद्धतीही त्यांना माहीत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्हीही यात सहभागी असाल तर येथे दिलेल्या टिप्स काळजीपूर्वक वाचा.

लाटणे कधी साफ करावे?

लाटणे बॅक्टेरियापासून सुरक्षित ठेवण्यासाठी, प्रत्येक वापरानंतर स्वच्छ करा. कारण त्यावर पिठाच्या ओलाव्यामुळे बुरशी आणि बॅक्टेरिया त्याकडे वेगाने आकर्षित होतात. त्यामुळे ते ठेवताना स्वच्छ करूनच ठेवावे.

लाटणे अशा प्रकारे स्वच्छ करा

लाटणे गरम पाण्यात एका मोठ्या भांड्यात 5 मिनिटे भिजवून ठेवा. आता हलके स्क्रब करून स्वच्छ करा. स्टील स्क्रबर वापरू नका कारण त्यामुळे पोळपाट आणि लाटणं खडबडीत होऊ शकते.

लाटणे धुल्यानंतर हे काम करा

लाटणे पाण्याने धुतल्यानंतर, ते पूर्णपणे कोरडे करा. नंतर त्यावर नारळ किंवा ऑलिव्हसारखे तेल चोळा. आता ३० मिनिटांनंतर स्वच्छ कापडाने पुसून स्वच्छ ठिकाणी ठेवा.

लाटणे महिन्यातून एकदा स्वच्छ करा

नियमित साफसफाई व्यतिरिक्त, लाटणे महिन्यातून एकदा स्वच्छ करण्याची शिफारस केली जाते. जेणेकरून लाकडात कोणतेही बॅक्टेरिया तयार होत असतील तर ते वेळेत बाहेर काढता येईल.

अशा परिस्थितीत महिन्यातून एकदा गरम पाणी आणि व्हिनेगरच्या मिश्रणात 10 मिनिटे भिजवून ठेवा. नंतर गरम पाण्याने चांगले धुवा आणि उन्हात वाळवल्यानंतर साठवा.

ही चूक करू नका

लाटणे जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवू नका. त्यावर जास्त वेळ ओले पीठ ठेवू नका. याशिवाय ते कधीही कोरडे न करता स्टोअर करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT