Health  sakal
लाइफस्टाइल

Health tips: तुम्हीही उभं राहून पाणी पिता का? जरा थांबा; आधी जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत

आरोग्य चांगलं राखण्यासाठी नियमित व पुरेसं पाणी पिणं आवश्‍यक आहे.

Aishwarya Musale

आरोग्य चांगलं राखण्यासाठी नियमित व पुरेसं पाणी पिणं आवश्‍यक आहे. पाणी शरीराच्या सर्वच क्रियांसाठी अत्यावश्‍यक असतं. शरीरातल्या विषारी पदार्थांना पाणी बाहेर फेकते. पाणी पिणं त्यामुळे फार गरजेचं आहे; मात्र चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायलं, तर नुकसान होतं. तुम्हाला पाणी पिण्याची योग्य पद्धत माहिती आहे का?

कधीही उभं राहून पाणी पिऊ नये. पाणी उभं राहून पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. म्हणून पाणी पिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि पाणी चुकीच्या पद्धतीने प्यायल्यास काय परिणाम होतात, हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

ऑफिसला जाताना किंवा प्रवासात अनेक जण उभे राहूनच पाणी पितात. हे चुकीचं आहे. पाण्याची शरीराच्या प्रत्येक भागाला गरज असते; उभं राहून पाणी पिल्याने पाणी अन्ननलिकेतून थेट वाहून जातं आणि शरीराला त्याचा विशेष फायदा होत नाही. म्हणूनच पाणी बसून प्यावं. पाणी बसून प्यायल्यास जास्त आराम पडतो आणि प्रत्येक अवयवाला पाण्याचा लाभ मिळू शकतो.

पाणी पिण्याची पद्धत आयुर्वेदात अतिशय तपशीलवार सांगण्यात आली आहे. आपली पचनक्रिया सुरळीत राहावी, यासाठी पाणी जेवणादरम्यान कधीही पिऊ नये. असे केल्याने लठ्ठपणा येतो. आयुर्वेद सांगतो,अन्नामुळे पोटात उष्णता/अग्नी निर्माण होतो आणि पाण्याचा शीतलता हा गुणधर्म असतो. त्यामुळे पाणी जेवणादरम्यान प्यायल्याने अग्नी शमतो आणि यामुळे पचन नीट होत नाही. तसेच विविध रोग होतात.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे जेवण्यापूर्वी आणि जेवणानंतर लगेचच पाणी पिऊ नये. जेवण्यापूर्वी आणि जेवणानंतर पाणी पिण्यासाठी नेहमी किमान 30 मिनिटांचे अंतर ठेवावे. असे केल्याने जठरातला पाचक रस पातळ होत नाही आणि अन्नपचनात अडथळा येत नाही. जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर लगेचच पाणी प्यायल्याने पाचन संस्थेला त्रास होतो आणि पचन क्रिया बिघडू शकते. म्हणूनच अशा वेळेत अगदी आवश्यक असेल तरच एक किंवा दोन घोट पाणी प्यावे.

जेवणानंतर अर्ध्या तासाने थंड पाणी पिण्यापेक्षा कोमट पाणी प्या. असे केल्यानेअन्न लवकर पचते. पाणी घटाघट न पिता, हळूहळू घोट-घोटाने प्यावे. एकाच दमात ग्लास भरून पाणी पिणे चुकीचे आहे. दिवसभरात प्रत्येक व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी किमान तीन ते चार लिटर पाणी पिण्याची गरज असते; मात्र तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावे, उगाचच पाणी पिऊ नये. या गोष्टींची पाणी पिताना काळजी घेणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: अमित शाह लोणीमध्ये दाखल

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT