Vitamin B12 Deficiency  Sakal
लाइफस्टाइल

Vitamin B12 Deficiency: चाळीशीनंतर 'जीवनसत्व बी 12' ची कमतरता असल्यास दिसतात 'ही' लक्षणे

Vitamin B12 Deficiency: शरीरात चाळीशीनंतर 'जीवनसत्व बी 12' ची कमतरता जाणवत असेल तर पुढील लक्षणे दिसून येतात.

सकाळ डिजिटल टीम

know about Vitamin B12 deficiency signs and symptoms after age of 40

निरोगी आणि तंदुरूस्त राहायचे असेल तर शरीरात जीवनसत्वांची गरज असते. जर शरीरात जीवनसत्वांची कमतरता असेल तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक लोकांच्या शरीरात चाळीशीनंतर जीवनसत्व बी 12 ची कमतरता जाणवते. यामुळे शरीरात कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया.

  • पाय आणि हातांमध्ये मुंग्या येणे

जीवनसत्व बी 12 च्या कमतरतेमुळे हात आणि पायांमध्ये मुंग्या येतात. कारण मज्जासंस्थेमध्ये जीवनसत्त्वे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तज्ञांच्या मते, त्याच्या कमतरतेमुळे, लोकांना मज्जातंतूशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात किंवा मज्जातंतू खराब होऊ शकते.

  • चालतांना त्रास

जर तुम्हाला चालण्यात किंवा संतुलन राखण्यात अडचण येत असेल तर हे देखील जीवनसत्व बी 12 च्या कमतरतेचे लक्षण असू शकते. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होते नसा कमकुवत होतात.

  • सूज आणि जळजळ होणे

जर तुम्हाला तुमच्या पायात सूज येत असेल किंवा जळजळ होत असेल तर हे देखील जीवनसत्व बी 12 च्या कमतरतेचे लक्षण असू शकते.

  • सांधेदुखी

जीवनसत्व बी12 च्या कमतरतेमुळे सांधेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे शारिरीक हालचाली करणे अवघड होते.

  • त्वचेचा रंग बदलणे

जीवनसत्व बी 12 च्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग फिकट किंवा पिवळा होतो. असे लक्षण पायांमध्ये दिसून येते. त्वचेवर असे बदल घडतात जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर पुरेसे लाल रक्तपेशी तयार करू शकत नाही.

  • व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरता कशी भरून काढावी

आरोग्य तज्ज्ञांच्या मते आहार आणि योगा करावा.

आहारात पनीर, चीज, दुध यासारख्या पदार्थांचा समावेश करावा.

रोजच्या आहारात पालक, मेथी यासारख्या पालेभाज्यांचा समावेश करावा.

अंडी आणि मासे जीवनसत्व बी 12चा चांगला स्त्रोत मानला जातो.

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT