लाइफस्टाइल

समुद्रात ब्रीज कसे उभारले जातात माहित आहे का?

जाणून घ्या, समुद्रात कसे उभे राहतात ब्रीज

शर्वरी जोशी

दोन ठिकाणांमधील अंतर कमी व्हावं आणि प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनेक ठिकाणी मोठमोठे ब्रीज (bridge) बांधल्याचं पाहायला मिळतं. या ब्रीजमुळे म्हणजेच पूलांमुळे वाहतूक करणं अत्यंत सोपं झालं असून व्यक्ती कमी कालावधीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पोहोचते. हा प्रवास करत असतांना अनेकदा आपण सागरी ब्रीजवरुनही जात असतो. मात्र, पाण्याचा प्रवाह सुरु असतांना हे ब्रीज समुद्रात नेमके कसे बांधले जात असतील? हा प्रश्न नक्कीच काहींना पडला असेल. म्हणूनच, समुद्राच्या वाहत्या पाण्यात हे ब्रीज कसे उभारले जातात ते आज जाणून घेऊयात. (know-how-bridge-pillar-made-in-sea)

समुद्र किंवा नदीमध्ये उभारण्यात येणारे म्हणजेच बांधण्यात येणारे ब्रीज वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यात साधारणपणे सस्पेंशन ब्रीज, बीम ब्रीज, कमान ब्रीज असे काही प्रकार आहेत. हे ब्रीज तयार करत असतांना प्रथम पाण्याची खोली, पाण्याचा प्रवाह, समुद्रातील मातीची गुणवत्ता आणि ब्रीज तयार झाल्यावर त्याच्यावर येणारा गाड्यांचा भार अंदाजे किती असेल याचा अभ्यास केला जातो.

ब्रीज उभारतांना फाउंडेशन अत्यंत गरजेचं

पाण्यात ब्रीज उभारण्यापूर्वी त्याच फाउंडेशन व्यवस्थित तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण, हे फाउंडेशनच ब्रीजचा महत्त्वपूर्ण भाग असतो. एकप्रकारे तो ब्रीजचा पायाच असतो. पाण्यात उभारण्यात येणाऱ्या या पायाला कॉफरडॅम (Cofferdam) असं म्हटलं जातं. स्टीलच्या मोठ्या प्लेटपासून हे कॉफरडॅम तयार केले जातात. त्यानंतर, मोठमोठ्या क्रेनच्या मदतीने हे कॉफरडॅम पाण्याच्या मध्यभागी ठेवले जातात. या कॉफरडॅमचा आकार गोल किंवा चौरस असतो. हे कॉफरडॅम बसवल्यानंतर पाणी त्याच्या बाहेरुन प्रवाहित होत असतं. परंतु, त्याच्या आता पाणी जात नाही. ज्यावेळी कॉफरडॅममधून समुद्राखालील माती दिसू लागते. त्यावेळी तेथे खांब तयार करण्याचं काम सुरु केलं जातं. हे खांब तयार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ब्रीज तयार केला जातो.

दरम्यान, जर पाणी खोल असेल तर तेथे कॉफरडॅम वापरुन ब्रीज बांधता येत नाही. त्यासाठी प्रथम जमिनीखाली संशोधन करावं लागतं. जेथे माती चांगली असेल तिथे ब्रीजचं काम केलं जातं. ज्या ठिकाणी जमीन चांगली असते तेथे खड्डे खणून पाईप्स टाकले जातात. त्यानंतर या पाईप्समधून पाणी काढलं जातं व त्या पाईपमध्ये सिमेंट व अन्य वस्तू टाकल्या जातात. असे अनेक पाईप्स एकत्र केल्यानतंर मग पिलर उभारले जातात.

असा तयार होतो ब्रीज

ब्रीज तयार करण्यासाठी लागणारं सारं काम हे अन्य ठिकाणी केलं जातं. त्यानंतर, तयार झालेले ब्लॉक दोन्ही खांबादरम्यान लावून त्यापासून ब्रीज तयार केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT