cold coffee google
लाइफस्टाइल

घरातच करता येत असेल कोल्ड कॉफी तर कॅफेमध्ये जायची काय गरज ?

जसा पावसाळ्यात गरम चहा दिलासा देतो तशीच उन्हाळ्यात कोल्ड कॉफी दिलासा देते.

नमिता धुरी

मुंबई : cold coffee कोणत्याही ऋतूत चांगलीच वाटते. सध्या सुरू असलेल्या प्रचंड उन्हाळ्यात तर कोल्ड कॉफी पिण्याची मजा काही वेगळीच असेल. या कॉफीसाठी फार काही सामग्री लागत नसल्याने ती करायलाही सोपी असते.

सध्या दुपारच्या उन्हात cold drink पिण्यासाठी बाहेर तर पडता येणार नाही. मग घरातच का करू नये कोल्ड कॉफी ! घरातच केली तर अगदी ५ ते १० मिनिटांत तयार होईल आणि पोटभर पिता येईल.

कोल्ड कॉफी करण्यासाठी आवश्यक आहे दूध, vanilla ice cream, न्यूटेला, बर्फ, साखर, कॉफी पावडर. अशी सर्व सामग्री जमा झाली असेल तर खाली दिलेली पाककृती वाचा आणि तसे करा.

जसा पावसाळ्यात गरम चहा दिलासा देतो तशीच उन्हाळ्यात कोल्ड कॉफी दिलासा देते. नुटेला, कॉफी, क्रीम यांपासून तयार झालेली कॉफी निराळाच स्वाद देईल. या स्वादिष्ट कोल्ड कॉफीचा आस्वाद तुम्ही स्वत: घ्या आणि कुटुंबालाही द्या. ज्यांना नुटेला आवडते त्यांच्यासाठी तर ही कॉफी म्हणजे मेजवानीच. यासाठी काही नेमक्या गोष्टी मात्र कराव्या लागतील.

नुटेला कोल्ड कॉफीसाठी आवश्यक साहित्य

२ कप थंड दूध,

२ चमचे कॉफी पावडर,

१ चमचा व्हॅनिला आइस्क्रीम,

२ चमचे साखर,

२ चमचे नुटेला,

अर्धा कप बर्फाचे तुकडे

पाककृती

दूध, कॉफी पावडर, नुटेला, साखर, आइस्क्रीम अशा सर्व सामग्रीचे मिश्रण करून घ्या. एका ग्लासात २-३ बर्फाचे तुकडे आणि आइस्क्रीम घ्या. त्यावर मिश्रण ओता. यावर थोडीशी कॉफी पावडर घालून किंवा चॉकलेट सिरम घालून तुम्ही ही कोल्ड कॉफी पिऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT