रीठ्याचे फायदे Esakal
लाइफस्टाइल

लांबसडक आणि चमकदार केसांसाठी Ritha Oil फायदेशीर

आयुर्वेदातही Ayurveda निरोगी केसांसाठी रीठ्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. केस गळती थांबण्यापासून ते केसांच्या वाढीसाठी रिठ्याचं तेल उपयुक्त ठरतं. घरच्या घरीच तुम्ही हे तेल तयार करू शकता.

Kirti Wadkar

वाढतं प्रदूषण आणि धुळीमुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. तसचं ताण तणाव आणि केमिकल असलेल्या हेअर प्रोडक्टमुळे Hair Products केसांच्या समस्या वाढू लागल्या आहेत. Know How to make Ritha Oil in Home for your Hair

केस अकाली गळणं Hair Fall, केस ड्राय तसचं निस्तेज होण, केस पांढरे होणं अशा समस्या निर्माण होत आहेत. अलिकडे केसांसाठी बाजारामध्ये वेगवेगळे हेअर प्रोडक्ट Hair Products मिळू लागले आहेत. मात्र यातील केमिकल्समुळे कालांतराने केसांवर फोगी विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. 

यासाठीच तुम्ही घरच्या घरी तयार करण्यात आलेल्या रीठाच्या तेलाचा वापर केस निरोगी राखण्यासाठी करू शकता.

आयुर्वेदातही Ayurveda निरोगी केसांसाठी रीठ्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. केस गळती थांबण्यापासून ते केसां वाढीसाठी रिठ्याचं तेल उपयुक्त ठरतं. घरच्या घरीच तुम्ही हे तेल तयार करू शकता. 

रीठा तेल तयार करण्यासाठी तुम्हाला रिठ्याचे तुकडे, आवळ्याचे तुकडे आणि नारळाचं तेल या सामुग्रीची आवश्यकता आहे. 

रीठा तेल कसं तयार करावं

रीठा तेल तयार करण्यासाठी एका कढईमध्ये रीठा आणि आवळ्याचे तुकडे मंद आचेवर चांगले भाजून घ्या.  त्यानंतर ते थंड होण्यासाठी ठेवा.

- त्यानंतर यात नारळाचं तेल टाकून काही वेळ राहू द्या. 

- अशा प्रकारे रीठा तेल तयार होईल. 

हे देखिल वाचा-

रीठा तेल कसं लावावं. 

रात्री झोपण्यापूर्वी रीठाचं तेल स्कॅल्प आणि केसांना लावून चांगलं मालिश करा. त्यानंतर रात्रभर हे तेल राहू द्या. दुसऱ्या दिवशी सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून ३ वेळा हे तेल लावल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होवून केस लवकर वाढतील. 

रीठा तेलाचे फायदे

१. स्कॅल्प इंफेक्शन दूर होईल- रीठ्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात. यामुळे इंफेक्शन तसचं केसातील कोंडा दूर होण्यास मदत होते.  तसचं डोक्यातील उवांची समस्या देखील दूर करण्यासाठी रीठ्याचं तेल उपयुक्त ठरतं. 

तसचं घाण आणि तेलकटपणामुळे स्कॅल्पवरील इंफेक्शन दूर करण्यासाठी रीठा प्रभावी उपाय आहे. 

२. पांढऱ्या केसांची समस्या होईल दूर- अनेकदा बदलत्या वातावरणामुळे केस निर्जीव आणि निस्तेज दिसू लागतात. अशा केसांना रीठा तेलामुळे पुन्हा चमक येते. रीठ्यामुळं केसांची वाढ होण्यास मदत होते. तसचं रीठा तेलाने मजास केल्याने कोलेजन बूस्ट होण्यास मदत होते परिणामी पांढऱे केस पुन्हा काळे होण्यास मदत होते. 

या तेलाच्या नियमित वापरामुळे केस मजबुत होतात. त्यामुळे केस गळणं कमी होऊन केस दाट होतात. 

३. ड्राय केसांसाठी- ड्राय केसांना पुन्हा चमक मिळवायची असेल तर रीठा तेल फायदेशीर ठरू शकतं. यामुळे केसांचा पोत सुधारतो. केस मऊ होण्यास मदत होते. आणि स्कॅल्पला पुरेस पोषण मिळाल्याने केस वाढण्यास मदत होते. 

जर तुम्हाला काळेभोर , लांबसडक तसचं मऊ आणि चमकदार केस हवे असतील तर घरीच तयार केलेल्या या रीठा तेलाचा नियमित वापर करा. यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT