Black Salt sakal
लाइफस्टाइल

Black Salt Benefits: काळं मीठ खाल्ल्यानं तुमच्या शरीरावर नक्की काय परिणाम होतो? जाणून घ्या

काळ्या मीठाचा वापर प्रत्येक घराघरात केला जातो.

Aishwarya Musale

काळ्या मीठाचा वापर प्रत्येक घराघरात केला जातो. बरेचदा लोक ते सॅलड, पेरूवर टाकून खातात. पण तुम्हाला माहित आहे का की ते खाल्ल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होतात. काळ्या मिठाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

काळ्या मिठाचे फायदे

काळ्या मीठाचे सेवन केल्याने पचनाशी संबंधित समस्या कमी होतात. गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. काळं मीठ छातीत जळजळ नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी काळे मीठ खूप फायदेशीर आहे. त्याचा वापर जेवणात केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामध्ये नेहमीच्या मिठापेक्षा कमी प्रमाणात सोडियम असते. जे शरीरात इन्सुलिनचे उत्पादन सामान्य ठेवते.

काळ्या मिठामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे पायांची सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. काळे मीठ असलेल्या कोमट पाण्यात पाय भिजवल्याने वेदना आणि टाचांच्या भेगा यापासून आराम मिळतो.

ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी काळे मीठ फायदेशीर ठरू शकते. त्याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. कारण त्यामध्ये सोडियमचे प्रमाण खूप कमी असते. काळ्या मिठात कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात.

काळ्या मिठात अनेक प्रकारचे पोषक आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. याच्या रोज सेवनाने हाडांना फायदा होतो आणि हाडे मजबूत होतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण काळे मीठ साखरेच्या रुग्णांना जास्त फायदे देते. याच्या सेवनाने साखरेची समस्या कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT