Soan Papdi sakal
लाइफस्टाइल

Diwali Soan Papdi: दिवाळीला गिफ्ट म्हणून सर्वांच्या घरी फिरणारी 'सोनपापडी' आली तरी कुठून? जाणून घ्या या मिठाईचा इतिहास

भारतात मिठायांचे एवढे प्रकार असताना दिवाळीत सोनपापडीला एवढं महत्त्व का आहे?

Aishwarya Musale

दिवाळीच्या आसपास मिठाईची मागणी खूप वाढते. लोक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात आणि मिठाईही देतात. अशा वेळी घरात वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई असतात, पण दिवाळी येताच सगळ्यात जास्त चर्चेत असते ती 'सोन पापडी'.

सोन पापडी दिवाळीत चर्चेत येण्याची अनेक कारणे आहेत. त्याची काही प्रमुख कारणे म्हणजे गिफ्ट म्हणून दिली जाणारी मिठाई, सोशल मीडियावर त्यावर अनेक मीम्स आहेत.

तोंडात ठेवताच विरघळणारी ही मिठाई भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या मिठाईचे नाव माहित आहे. आज सण आणि दिवाळीच्या निमित्ताने जाणून घ्या, इतकी लोकप्रिय झालेली सोन पापडी कुठून आली आहे.

सोन पापडीचा इतिहास

मावा व्यतिरिक्त, भारतामध्ये बेसनपासून मिठाई तयार करण्याचा इतिहास आहे. सोन पापडीचा भारतात कोणताही इतिहास नसला तरी त्याचा उगम पश्चिम महाराष्ट्रातून झाला असे म्हटले जाते. ही मिठाई मुख्यत्वे पिस्मानीये या तुर्की मिठाईच्या विशेष प्रकारापासून प्रेरित आहे. मात्र, पिस्‍मानियेमध्ये बेसनाऐवजी पिठाचा वापर केला जातो. हे मैदा, साखर, लोणी आणि पिस्त्यांपासून तयार केले जाते.

सोन पापडी देशभर लोकप्रिय आहे

भाजलेले बेसन, साखर आणि खरबूजाच्या बिया सोन पापडीमध्ये वापरल्या जातात. सोन पापडीला भारतात इतरही अनेक नावांनी ओळखले जाते. सोन पापडीला सान पापडी, शोमपाडी आणि सोहन पापडी इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. पतिसा हा सोन पापडीचा एक वेगळा प्रकार आहे, तो भारतातील सर्वात लोकप्रिय मिठाईंपैकी एक आहे. सोन पापडीपेक्षा ते थोडे कठीण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Food Poisoning: महाप्रसादातून विषबाधा, गर्भवतीने बाळाला जन्म दिला पण दीड दिवसातच चिमुकल्याचा मृत्यू

IND vs NZ 3rd T20I: भुवनेश्वर कुमार, वैभव सूर्यवंशी OUT; इशान किशन IN! तिसऱ्या सामन्यासाठी Playing XI मध्ये होणार बदल

‘आम्ही हिंदू आहोत, आमच्याकडे घटस्फोट होत नाही' कोमल रानी स्वर्णकारसोबत अफेअरवर गोविंदांने अखेर सोडलं मौन; म्हणाला...

Ichalkaranji Crime : पहाटे भांडले, पत्नीने झोपेच सोंग घेत पतीचा काटा काढला अन्; झोपून सकाळी मुलीसोबत पोलिस स्टेशन गाठलं, इचलकरंजीत धक्कादायक घटना

Latest Marathi News Update : विहिरीच्या पाणी घेण्यावरून वाद, पुतण्यानं काका-काकूची केली हत्या

SCROLL FOR NEXT