know these 5 ways how reliable your friend is to you 
लाइफस्टाइल

तुमचे मित्र-मैत्रीण किती विश्वासू आहेत हे 'या' पद्धतीने ओळखा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना मित्र मैत्रीणी असतातच. आपल्या मित्र मैत्रीणीसोबत अनेकजण सुख दुःखाच्या गोष्टी शेअर करतात. त्यात बर्‍याच वेळा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये असे काही लोक असतात ज्यांना आपले चांगलेपणा नको वाटतो आणि तो मित्र किंवा मैत्रीण आपला हितचिंतक बनूनच आपल्याला दुखावतो हे आपल्याला कळत नाही.

आपला फ्रेंड सर्कल बराच मोठा असतो, परंतु त्यापैकी केवळ काही मित्र- मैत्रीणी असे असतात, ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. बर्‍याच वेळा आपल्या  फ्रेंड सर्कलमध्ये असे काही लोक असतात, ज्यांना आपले चांगले कधीच नको असते. आपले मित्र-मैत्रीण आपला हितचिंतक म्हणून आपले नुकसान करतो आणि आपल्या यशाने सतत जळत राहतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुमचे कोणते मित्र-मैत्रीण अविश्वासू आहेत हे काही गोष्टी मुळे तुम्हाला समजून जाईल.   

आरोप करण्यात तज्ज्ञ

जर आपल्या काही मित्र-मैत्रीणींनी आपली छोटीशी चर्चा मोठी करून सांगत असतील तर ती आपल्या विश्वासावर देखील योग्य नाही. असे लोकसुद्धा इतरांवर आरोप ठेवण्यास मागेपुढे पाहत नाहीत आणि कोणालाही विश्वास न ठेवण्याची आणि नेहमीच दुसर्‍यांकडे बोट दाखविण्याची त्यांची सवय असते. जर असे मित्र-मैत्रीणी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असतील तर ते तुमच्या विश्वासास पात्र नाहीत.

काही लोक तुमच्या सर्वकाही गोष्टी नाकारतील

जर तुमचे मित्र-मैत्रीण तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीस नकार देत असेल तर तुम्ही समजू शकता की ते तुमचे जवळचे मित्र-मैत्रीण नाहीत. कारण आपण काहीतरी चांगले करण्याचा विचार करत असल्यास परंतु तो तुमच्याशी सहमत होणार नाही. तसेच तुमच्या मित्र- मैत्रीणीची वागणूक देखील बदलेले दिसून येतील.

विश्वास (ट्रस्ट) तोडणारे मित्र-मैत्रीणी फसवे असतात

तुम्ही तुमच्या खास मित्र-मैत्रीणीवर खूप विश्वास ठेवला आहे आणि त्याच्याबरोबर सर्व काही शेयर करत असता. परंतु जर ते मित्र-मैत्रीणी तुमचा विश्वास मोडत असतील तर तुम्ही त्याच्याशी मैत्री ठेवू नये. तुमचे खास मित्र-मैत्रीणी असे काहीतरी करू शकतात की, त्याने तुमचे काही टॉप सीक्रेट किंवा इतर काही बाबतीत फसवणूक करू शकतात तर आपण अशा लोकांपासून योग्य अंतर ठेवले पाहिजे.

कधीही माफ करू नका

काहींचे असेही काही मित्र-मैत्रीणी आहेत जे चुका करतात आणि परत तुम्हाला दुखातात. परंतु चूक करून सुद्धा सॉरी बोलत नाहीत. तसेच ते इतरांना स्वतः बरोबर असल्याचे दाखवून द्यायचा प्रयत्न करतात. ज्या लोकांना केवळ आपल्याला दुखावयला जमते आणि स्वतःला आपले हितचिंतक म्हणवतात आणि तरीही सॉरी म्हणत नाहीत, अशा लोकांवर विश्वास ठेवणे ही चुकीचे असेल. 

सीक्रेट शेयर करू नका 

जर तुमचे मित्र-मैत्रीण तुमच्या कोणत्याही सीक्रेट गोष्टी कोणाबरोबर शेयर करत असतील तर ते फ्रेंड्स सर्कल तुमच्या विश्वासास पात्र नसेल. 

संपादन : सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT