लाइफस्टाइल

Korean Skincare Routine : नितळ त्वचा हवी आहे? मग फॉलो करा ‘हे’ कोरिअन स्किनकेअर रूटीन

कोरिअन स्किनकेअर रूटीनमध्ये घरगुती उपायांसोबत ठराविक स्किनकेअर प्रॉडक्ट्सवर भर दिला जातो.

सकाळ डिजिटल टीम

Korean Skincare Routine : कोरिअन महिलांचे सौंदर्य हे नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला आहे. कोरिअन महिलांची त्वचा ही नितळ, काचेसारखी स्वच्छ आणि सुंदर असते. कोरिअन महिला त्यांच्या त्वचेची खास काळजी घेतात.

कोरिअन स्किनकेअर रूटीनमध्ये घरगुती आणि आयुर्वेदिक गोष्टींसोबत काही ठराविक स्किनकेअर प्रॉडक्ट्सवर जास्त भर दिला जातो. तांदळापासून बनवले जाणारे फेस पॅक्स, राईस वॉटर, राईस टोनर अशा कितीतरी गोष्टींचा ते प्रामुख्याने वापर करतात. शिवाय, त्यांच एक खास स्किनकेअर रूटीन असतं, ज्यामुळे, त्यांची स्किन नितळ आणि सुंदर दिसते.

आज आम्ही तुम्हाला कोरिअन स्किनकेअर रूटीनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये ३ स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. ज्याच्या मदतीने तुम्ही देखील हे स्किनकेअर रूटीन फॉलो करून तुमची त्वचा नितळ ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकालं.

कोरिअन स्किनकेअर रूटीन

३ स्टेप्स असणार हे कोरिअन स्किनकेअर रूटीन अगदी पटकन करता येणारं आणि करण्यास सोप असं रूटीन आहे. त्या ३ स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत.

चेहरा स्वच्छ करा

चेहऱ्यावरील धूळ, तेलकटपणा, मेकअप आणि सीबम हटवण्यासाठी कोरिअन स्किन केअर रूटीनमध्ये ऑईल बेस्ड क्लिंजरचा वापर करतात. ऑईल बेस्ड क्लिंजरचा वापर करून चेहरा स्वच्छ करतात. ज्यामुळे, त्वचा हायड्रेटेड राहते.

आता ऑईल बेस्ड क्लिंजरने चेहरा स्वच्छ केल्यानंतर, कोरिअन स्किन केअर रूटीनमध्ये वॉटर बेस्ड क्लिंजरचा ही वापर केला जातो. या मागील कारण म्हणजे ऑईल बेस्ड क्लिंजरचा वापर केल्यानंतर ही कधीकधी चेहऱ्यावरील धूळ, तेलकटपणा पूर्णपणे निघून जात नाही, म्हणून वॉटर बेस्ड क्लिंजरचा वापर केला जातो.

टोनर आणि मॉईश्चरायझर

चेहरा छान प्रकारे स्वच्छ केल्यानंतर टोनरचा वापर केला जातो. चेहऱ्याचे संतुलन योग्य प्रकारे राखण्यासाठी कोरिअन स्किनकेअर रूटीनमध्ये टोनरचा वापर आवर्जून केला जातो. टोनर नंतर चेहऱ्यावरील ओलसरपणा टिकवून ठेवण्यासाठी मॉईश्चरायझरचा वापर केला जातो.

तेलकट त्वचा आणि कोरड्या त्वचेसाठी खास बनवण्यात आलेले मॉईश्चरायझर वापरण्याचा सल्ला कोरिअन स्किनकेअर रूटीनमध्ये दिला जातो.

सनस्क्रिन

चेहऱ्यावर टोनर आणि मॉईश्चरायझरचा वापर केल्यानंतर वेळ येते ती सनस्क्रिनची. इतर स्किनकेअर रूटीनमध्ये ज्या प्रकारे सनस्क्रिन वापरले जाते. त्याचप्रकारे, कोरिअन स्किनकेअर रूटीनमध्ये सनस्क्रिन वापरले जाते.

तुम्ही घराबाहेर पडा किंवा पडू नका. मात्र, सनस्क्रिन चेहऱ्यावर लावायला अजिबात विसरू नका. कमीत कमी ३० एसपीएफ असणारे सनस्क्रिन अवश्य लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT