Learn more about why saffron is so expensive 
लाइफस्टाइल

VIDEO : केसर इतकं महाग का विकलं जातं ? त्याचे कारण जाणून घ्या सविस्तर

सुस्मिता वडतिले

पुणे : केसर हा सर्वात महाग मसाल्याच्या पदार्थांपैकी एक आहे. औषधीय गुणधर्मांमुळे केसर सर्वांनाच माहित आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीय का? हेच केसर इतकं महाग का विकलं जात?  त्या मागचे कारण काय असेल. याचा तुम्ही कधी विचार केलाय का? कदाचित अनेकांना हा प्रश्नसुद्धा नक्कीच पडला असेल, बरोबर ना. चला तर मग त्याच्यामागील कारण आपण जाणून घेऊयात... 

केसर इतकं महाग का विकलं जात या मागचे खरे कारण असं आहे कि फक्त एक पौंड (०.४५३ kg) केसर साचवण्यासाठी तब्बल ७५ हजार फुलांचे पुंकेसर काढावा लागतो. केसरच्या फुलापासून केसर तयार केलं जातं. केसरचे फूल अतिशय नाजूक आणि मनमोहक दिसतं. म्हणून केसर हे सर्वात महाग असते. आजकाल केसर बाजारामध्ये तीन ते साडे तीन लाख प्रति किलोने विकलं जातं. बाजारामध्ये हिमालयीन केसर, अमेरिकन केसर, अफगाण केसर, चायना केसर सारख्या जातीचे केसर असून हिमालयीन केसर हे सर्वोत्तम केसर आहे.

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये केसरला मानाचं स्थान देण्यात आलं आहे. नैवेद्य शुद्ध करण्यासाठी त्यात आवर्जून केसर वापरलं जातं. केसरचा वापर करणं सर्वसामान्यांसाठी तसं थोडं महागाचं असू शकतं. मात्र केसर आरोग्यासाठी फारच उत्तम आहे. त्वचेच्या स्वास्थासाठी प्राचीन काळापासून सौदर्य उत्पादनांमध्ये केसरचा वापर करण्यात येतो.

केसर चिमूटभरच का वापरला जातो

केसर हे एक उष्ण गुणधर्माचा पदार्थ आहे. त्यामुळे त्याचा वापर योग्य प्रमाणात करणे फार गरजेचेे आहे. म्हणूनच केसरचा वापर नेहमी चिमूटभर मात्रेतच केला जातो.

- केसरचा रंग- गर्द केशरी
- वास - काहीसा सुगंधी पण विशिष्ट असा छान वास असतो
- आकार - २ ते २.५ cm लांब, टोकास गोलाकार निमुळते असते
- चव - थोडीसी कडवट असते
- दुधातील टेस्ट - दुधात टाकल्यावर केशर पिवळसर रंग येतो आणि केशर त्यात विरघळत नाही व ते लवचिक बनते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT