Leather Bags Care Tips Sakal
लाइफस्टाइल

Leather Bags: लेदर बॅग दिसेल नव्यासारखी फक्त फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Leather Bags Care Tips: लेदर बॅग कोणत्याही ड्रेससोबत मॅच होतात. अनेकजण लेदरच्या पर्स देखील वापरतात. पण त्याची काळजी घेत नाही यामुळे ते खराब होते.

Puja Bonkile

how to take care of luxury leather bag long time

लेदरच्या बॅग खुप महाग असतात. यामुळे लेदरच्या बॅग पुन्हा-पुन्हा खरेदी करणे खिशाला परवडणारे नसते. पण त्याच्या गुणवत्तेमुळे आणि क्लासी डिझाइनमुळे अनेक महिलांकडे याप्रकारच्या बॅग असतात.

लेदर बॅग कोणत्याही ड्रेससोबत मॅच होतात. अनेकजण लेदरच्या पर्स देखील वापरतात. पण त्याची काळजी घेत नाही यामुळे ते खराब होते. तुम्हाला लेदरची बॅग नव्यासारखी ठेवायची असेल तर पुढील गोष्टींचा वापर करू शकता.

  • बॅगवर लागलेले डाग स्वच्छ करावे

प्रवासात लेदरच्या बॅगवर काही डाग लागले असेल तर लगेच स्वच्छ करावे. कारण जास्त दिवस तसेच डाग ठेवल्यास बॅग खराब होऊ शकते. त्यामुळे लेदर बॅग नव्यासारखी ठेवायची असेल तर स्वच्छ ठेवावी.

  • बॅग झाकून ठेवावी

तुमची लेदर बॅग जास्त दिवस चांगली राहावी असे वाटत असेल तर काळजी घेणे गरजेचे आहे. लेदर बॅग नेहमी झाकून ठेवावी. यामुळे त्यावर धुळ बसणार नाही. तसेच बॅगची चमक कमी होणार नाही. यामुळे बॅग नव्यासारखी दिसेल.

  • जास्त सामान ठेऊ नका

जर तुम्ही कुठे फिरायला जात असाल तर बॅगमध्ये जास्त सामान ठेऊ नका. कारण सामानाचा ताण आल्याने बॅग फाटू शकते. यामुळे बॅगमध्ये कमीत-कमी सामान ठेवावे आणि घरी आल्यावर बॅग रिकामी करावी. जसे की लिपस्टिक, काजळ, क्रिम यासारख्या गोष्टी बॅगमधून बाहेर काढाव्या. कारण यामुळे बॅग खराब होण्याची शक्यता असते.

  • जास्त धुणे टाळावे

लेदर बॅग नव्यासारखी दिसण्यासाठी जास्त धुणे टाळावे. कारण यामुळे बॅगची चमक कमी होऊ शकते. तुम्ही अधूनमधून बॅगवरचे डाग स्वच्छ करण्यासाठी धुवू शकता. लेदर बॅगला स्क्रबरने घासू नका. यामुळे बॅग फाटू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Law: नामांकन वादांना पूर्णविराम? निवडणूक कायद्यात बदलांना मंजुरी; महापालिका निवडणुकीआधी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

Gen-Z Post Office: मुंबईत पहिले जेन-झी पोस्ट ऑफिस! विद्यार्थ्यांना विशेष फायदा होणार, काय आहेत सुविधा?

Railway Luggage Rules : विमानासारखेच नियम रेल्वेमध्येही लागू होणार! , ‘फर्स्ट एसी’मध्ये ७० किलो पर्यंतच सामान मोफत नेता येणार

Latest Marathi News Live Update : अधिकारी-कर्मचारी महासंघाचा उद्यापासून ‘कामबंद’चा इशारा

Pune Crime : अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई; साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त; पाच जणांना अटक!

SCROLL FOR NEXT