लाइफस्टाइल

Lemon Peel Use: रस काढून झाल्यावर लिंबूची साल फेकून देऊ नका, कामं खूप सोप्पी होतील

Pooja Karande-Kadam

Lemon Peel Use :

सरबतात लिंबू पिळला की तूम्ही त्याची साल फेकून देता. प्रत्येकाच्याच घरी असं होतं. काही लोक त्याला झाडात टाकतात जेणेकरून त्याचे खत होईल. पण आज आपण लिंबूच्या सालीचा वापर करून घर कसे चकचकीत करायचे हे पाहणार आहोत.

घरातील सिंकमधील नळावर असलेले डाग, बेसिनचे भांडे घाण असले की पाहुण्यांच्या नजरेत पटकन येतं. पाहुणे तोंडावर काही बोलले नाहीत तरी माघारी यावर चर्चा होते. तुम्हालाही असं कोणी नावं ठेवावं वाटत नसेल तर हे उपाय तुमच्या खूप कामी येणार आहेत.

बाथरूमचे नळ असे करा स्वच्छ

लिंबूच्या सालीच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील बाथरूम किंवा स्वयंपाकघरात बसवलेले नळ नव्यासारखे चमकू शकता. यासाठी लिंबाच्या साली असलेले पाणी उकळून दिवसभर तसेच ठेवा. (kitchen Hacks)

दुसऱ्या दिवशी ते पुन्हा हलके गरम करा. त्यात आणि बादल्या आणि प्लास्टिकची भांडी स्वच्छ करा. या उपायाने तुमच्या घरातील बादल्या आणि नळ नव्यासारखे चमकू लागतील.

चमच्यांवरील डाग

चमचे आणि भांड्यांवरील हळदीचे डाग सहजासहजी जात नाहीत. ते खूप वाईट दिसते. ते साफ करण्यासाठी तुम्ही लिंबाची साल वापरू शकता. यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात अर्धा ग्लास पाणी टाका, त्यात लिंबाची साले टाकून उकळा.

आता हे पाणी थोडे थंड करून त्यात भांडी भिजवून ठेवा. 5 ते 10 मिनिटांनंतर ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. तुम्हाला दिसेल की हळदीचा डाग पूर्णपणे नाहीसा झाला आहे.बाथरूम बेसिन आणि किचन सिंक स्वच्छ करा. (Kitchen Tips)

उकडलेले लिंबू साले

एका भांड्यात लिंबाची साल पाण्यात टाकून उकळून घ्यावी लागते. यानंतर सिंक आणि बाथरूमच्या बेसिनमध्ये हे पाणी टाका. हे काम करताना तोंडावर कापड बांधा. जेणेकरून बेसिनवर वाफेच्या रूपात बाहेर पडणारी घाण तुमच्या शरीरात जाणार नाही.

आता ब्रशच्या मदतीने बेसिन घासून घ्या. ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला साबण किंवा डिटर्जंटची गरज भासणार नाही. त्या गोष्टींशिवायही बेसिन चकचकीत होईल.(Home Cleaning Tips)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT