Lemongrass Tea Benefits Sakal
लाइफस्टाइल

Lemongrass Tea: 'या' चहाचे नियमितपणे सेवन केल्यास वजन राहू शकते नियंत्रणात

Lemongrass Tea: लेमनग्रास चहा पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तुम्ही नियमितपणे सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहते.

Puja Bonkile

Lemongrass Tea Benefits: अनेक लोक वजन कमी करण्यासाठी विविध उपाय करतात. पण रिझल्ट मिळत नाही. तुम्ही आहारात लेमनग्रासचे सेवन करू शकता. ही एक औषधी वनस्पती आहे. याला लिंबूवर्गीय चव असून अनेक पोषक घटक आहेत. याचे औषधी गुणधर्म सर्व प्रकारच्या आरोग्य समस्यां दूर ठेवतात. आहारात लेमनग्रास समाविष्ट करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचा चहा. या औषधी वनस्पतीच्या चहाला उत्कृष्ट चव असून प्रत्येकाला त्याची चव खूप आवडते. चला तर मग जाणून घेऊया लेमनग्रास चहाचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत.

लेमनग्रास चहाचे आरोग्यदायी फायदे

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

लेमनग्रास चहा पचन सुलभ ठेवते. तसेच चरबी कमी होण्यास मदत मिळते. सकाळी नियमितपणे चहा प्यायल्याने भूक लागत नाही. यामुळे कॅलरीज मर्यादित राहतात.वजन वाढत नाही.

अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध

लेमनग्रास चहामध्ये क्लोरोजेनिक अॅसिड, आयसोसायनिन आणि स्वर्टियाजापोनिन यासह अनेक अँटिऑक्सिडंट असतात. जे तुमच्या शरीरातील मुक्त रॅडिकल्स नष्ट करण्यात मदत करू शकतात.

बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध

लेमनग्रास चहामध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. लेमनग्रासमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो. ज्यामुळे तोंडी संक्रमण आणि पोकळीवर उपचार करण्यात मदत होते. यासह, हे विविध प्रकारचे जीवाणू आणि बुरशीविरूद्ध प्रभावीपणे कार्य करते. लेमनग्रास चहाचे नियमित सेवन केल्याने संसर्ग टाळण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mayor Election : मुंबईत ‘खेला’ होणार, महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार? ; बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना आवाहन!

IND vs NZ 2nd T20I : सुसाट सुटलेल्या न्यूझीलंडला हर्षित राणाने रोखले, विकेटनंतर केला 'तो' इशारा; नेमका अर्थ काय? VIDEO

Maharashtra Schemes: आरोग्य, शिक्षण आणि समाजकल्याणावर लक्ष... एकनाथ शिंदेंकडून अनेक योजनांची घोषणा; जाणून घ्या कोणत्या?

Insurance: मृत्यू किंवा अपघातानंतर क्रेडिट बिल किंवा कर्ज कोण भरणार? 'हा' विमा ठरू शकतो संरक्षणाची ढाल; वाचा विम्याची भूमिका

मुरांबा फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात ! लग्नाचे फोटो चर्चेत, 'या' क्षेत्रात करते पत्नी काम

SCROLL FOR NEXT