Fitness esakal
लाइफस्टाइल

Fitness: पाेटावरचा घेर करायचा आहे कमी तर खा या विशिष्ट प्रकारच्या बिया

सकाळ वृत्तसेवा

तुमचं पोट सुटलय का ?आणि ते कमी व्हायचं नावचं घेत नाही, तर तुमच्या साठी घेऊन आलो आहोत हे तीन रामबाण उपाय.

काळानुरुप बदलत जाणारे आपले जीवन...आणि रोजच्या दिनचर्येत घडणारे बदल. याचा आपल्या शरीरावर खुप मोठा परिणाम होताना दिसतो.

घर, ऑफिस काम हे सगळ करत असताना आपण आपल्याच कडे दुर्लक्ष करतो. तसेच व्यायामा साठी वेळ न काढणे, फास्ट फूड, या गोष्टीमुळे आपण आपल्याच शरीराला दुखण्याचं आमंत्रण देतो . त्यामुळे वजन वाढणे, डायबेटीज, थायरॉईड यांसारख्या आजारांना देखील आपण आमंत्रण देतो.

सध्या वजन वाढी सारख्या गंभीर समस्याला आपल्याला सामोरे जावं लागत आहे. आज जो तो वजन आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्यामुळे आम्ही एक खास उपाय घेऊन आलो आहोत...या तीन प्रकारच्या बियाचं सेवन केल्यास निश्चितच तुम्हाला वजन कमी करायाला मदत मिळेल.

Fitness

जाणून घेऊयात कोणत्या प्रकारच्या बिया

जवस :

जवसला आयुर्वेदा मध्ये खूप महत्व आहे. तसेच किचनमध्ये देखील जवसाच्या चटणीला खूप महत्व आहे. कारण या मध्ये पोषक द्रव्य असतात.त्यातील ओमेगा ३ फॅटी ऍसिड आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. तसेच यात खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फायबर, आयरन चे प्रमाण असल्यामुळे आपल्या शरीरासाठी जवस खाणे कधी हि बेस्ट. तुम्ही जवसची चटणी , धपाटे, दही तसेच पाण्यासोबत देखील घेऊ शकता . रोज आहारात जेवण झाल्यानंतर भाजलेले जवस खावेत.

Fitness

सूर्यफुलाचे बी :

जेव्हा वजन कमी करण्याची इच्छा होते तेव्हा सूर्यफूल देखील मदत करते. सूर्य फुलाचे बी देखील तितकेच उपयोगी आहे. या बी मध्ये चरबी वितळण्यासाठीचे मुख्य गुणधर्म आहेत. या बी च्या सेवनाने आपली पचन प्रक्रिया सुधारते, वजन कमी करण्यास मदत होते. तुम्ही या बिया बारीक करून सूप, चहा यांसारख्या पेयांमध्ये घेऊ शकतात .

Fitness

चिया सीड्स :

चिया सीड्स देखील आपल्याला वजन कमी करण्यास मदत करते, रोजच्या नाश्ता करत असताना याचे सेवन केले तर तुमचे पोट भरलेले राहील . कारण यामध्ये मेटाबॉईल्सम वाढण्याचे विशिष्ट गुण या मध्ये आहेत.

वरील सर्व प्रकारच्या बियांचे आपल्या नेहमीच्या आहारात नक्की सेवन करा. आणि वजन वाढी पासून मुक्तता मिळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT