लाइफस्टाइल

वर्किंग कपल्ससाठी जॉइंट फॅमिली आहे वरदान

एकत्र कुटुंब पद्धतीचा होतो मुलांवर सकारात्मक परिणाम

शर्वरी जोशी

भारतात अनादी काळापासून एकत्र कुटुंब पद्धती joint family चालत आलेली आहे. त्यामुळे कित्येक पिढ्या वर्षानुवर्ष एकाच घरात सुखाने नांदत आहेत. परंतु, गेल्या काही काळात विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सध्या आई-वडील व मुलं असं चौकोनी कुटुंब असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच अनेक कुटुंबात दोन्ही पालक वर्किंग पर्सन असल्यामुळे घरात केवळ मुले एकटीच असतात. म्हणूनच, आज आपण एकत्र कुटुंब पद्धतीत राहण्याचे फायदे कोणते ते पाहुयात. (lifestyle-5-advantages-of-living-in-a-joint-family-ssj93)

१. कुटुंबाशी घनिष्ठ नातं -

ज्यावेळी आपण एकत्र कुटुंबात राहत असतो. त्यावेळी घरातील सकारात्मक वातावरणाचा परिणाम मुलांवर होत असतो. सोबतच घरातील वडिलधारी मंडळी, भावंड यांच्यासोबत मुलांचं नातं अधिक दृढ होतं. इतकंच नाही तर या सगळ्याचा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावरही होतो. मुलं एकलकोंडी होत नाही. तसंच घरात प्रत्येक जण वेगवेगळ्या स्वभावाचे असतात. त्यामुळे या सगळ्यांच्या स्वभावासोबत जुळवून घेण्याची मुलांना सवय होते. परिणामी, घराबाहेरदेखील वेगळ्या स्वभावाची लोक भेटल्यावर मुलं त्यांच्यासोबत सहज जुळवून घेतात.

२. मुलांचा योग्य पद्धतीने विकास होतो -

विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आई -वडील दोघंही ऑफिसला जात असल्यामुळे मुलांना घरात एकटच राहावं लागतं. त्यातच आईवडिलांचं बिझी शेड्युल असल्यामुळे अनेकदा ते मुलांना योग्य तो वेळ देऊ शकत नाही. परिणामी, मुलं व पालक यांच्यातील संवाद कमी होतो. उलटपक्षी एकत्र कुटुंबात मुलांच्या अवतीभोवती सतत घरातील माणसांचा वावर असतो. त्यामुळे आई-वडील जरी ऑफिसला गेले तरी मुलांना एकटं वाटत नाही. त्यांच्या भोवती सतत आजी आजोबा, भावंड, काका-काकू असा परिवार असतो. विशेष म्हणजे या सगळ्यांच्या संपर्कातच मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो.

३. मुलांची काळजी नसते -

सध्याच्या काळात अनेक वर्किंग कपल्स मुलांना पाळणाघरात ठेवतात. मात्र,तरीदेखील त्यांना मुलांची सतत काळजी वाटत असते. परंतु, एकत्र कुटुंबात मुलांकडे लक्ष द्यायला अनेक जण असतात. मुळात ही सगळी मंडळी विश्वासू असल्यामुळे मुलांच्या आरोग्याकडे किंवा खाण्यापिण्याकडे कोणाचंही दुर्लक्ष होत नाही. त्यामुळे पालकांना मुलांची काळजी नसते.

४. कामाचं नियोजन-

विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये कामाचा सगळा भार हा पती-पत्नींवर पडतो. परिणामी, त्यातूनच मग वाद होतात. व त्याा परिणाम मुलांवर होतो. परंतु, एकत्र कुटुंबामध्ये प्रत्येक काम घरातील सदस्यांमध्ये वाटून दिलेलं असतं. त्यामुळे प्रत्येक काम पद्धतशीरपणे होतं व कोणावरही कामाचा भार येत नाही. यामुळे घरातील वातावरणही प्रसन्न व आनंदी रहातं.

५. आर्थिक सपोर्ट -

एकत्र कुटुंबात कमावणारे अनेक जण असतात. त्यामुळे घर खर्च करताना कोणावरही आर्थिक ताण येत नाही. तसंच एखाद्या प्रसंगी नोकरीमध्ये काही अडचण आली तरीदेखील घरात अन्य जण मदतीसाठी कायमच असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

SCROLL FOR NEXT