disadvantages of wristband
disadvantages of wristband Esakal
लाइफस्टाइल

सतत रिस्टबँड घालताय? ...सावधान, Wristband मुळे आरोग्य येईल धोक्यात

Kirti Wadkar

अनेकजण आवड म्हणून किंवा फॅशन म्हणून हातामध्ये रबरबॅण्ड किंवा रिस्टबँड Wristbank घालणं पसंत करतात. एखाद्या दिवशी हातात रिस्टबँड घालणं ठिक मात्र जर तुम्हाला हातात सतत रिस्टबँड घालण्याची सवय असेल तर ते तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. Lifestyle car news in Marathi Know dangers of wearing wristband constantly

कारण यामुळे तुमच्या शरीरात बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. फ्लोरिडा अटलांटिक यूनिवर्सिटी चार्लेस ईमधील काही संशोधकांनी मनगटावर घालण्यात येणाऱ्या स्मार्टवॉच Smart Watch तसंच रिस्टबँडमुळे शरीरावर बॅक्टेरिया Bacteria वाढून विविध आजार होण्याचा धोका असल्याचं म्हंटलं आहे.

संशोधकांच्या मते रिस्टबँडमुळे स्टॅफिलोकॉकस आणि ई कोलाई सारखे बॅक्टेरिया पसरण्याचा धोका अधिक असून यामुळे गंभीर आजार होवू शकतात. या अभ्यासात विविध प्रकारचे रिस्टबँड घालणाऱ्या व्यक्तींकडून काही सॅम्पल गोळा करण्यात आले. या नमुन्यांची चाचणी केली असता ई कोलाई, स्टॅफिलोकॉकस आणि त्वचेच्या विविध संसर्ग समोर आले.

या अभ्यासात रिस्टबँड घालणाऱ्यांतील ८५ टक्के लोकांमध्ये स्टॅफिलोकॉकस आढळून आलं तर ६० टक्के ई कोलाईचा धोका आढळून आला. स्टॅफिलोकॉकस हा ३० प्रकारच्या बॅक्टेरियाचा समूह असून हे इंफेक्शन झाल्यास निमोनिया, सांधेदुखी तसचं सांध्यांमध्ये इंफेक्शन होवू शकतं.

रिस्टबँडवर बॅक्टेरिया असे वाढतात

जास्त काळासाठी हातामध्ये रिस्टबँड घातल्याने विविध प्रकारे बॅक्टेरिया वाढू लागतात आणि ते पसरतात.

हे देखिल वाचा-

त्वचेच्या संपर्कात आल्यास- रिस्टबँड मनगटावर असल्याने ते थेट त्वचेच्या संपर्कात येतं. त्वचेतून निघणारी उष्णता आणि घामाच्या ते थेट संपर्कात आल्याने बॅक्टेरियाच्या वाढीस पूरक वातावरण निर्माण होतं. बराच काळ ते एकाच जागी चिटकून असल्याने उबदार वातावरणात बॅक्टेरियाची वाढ झपाट्याने होते आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

घाम आणि ओलावा- स्टॅफिलोकॉकस अनेकदा वर्कआउट करताना किंवा एखादा खेळ खेळताना रिस्टबँड घातलं जातं. अशावेळी शरीर सक्रिय असल्याने मोठ्या प्रमाणात घाम येतो. ज्यामुळे रिस्टबँटमध्ये ओलावा राहिल्याने दमट वातावरण निर्मिती झाल्याने बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. तसचं घामामध्ये मीठ आणि बॅक्टेरियाच्या वाढीस अन्य पोषक तत्व असल्याने बॅक्टेरियाची निर्मिती होते.

स्वच्छतेचा अभाव- अनेकदा हातातील मोबाईल किंवा लॅपटॉपसारख्या गॅजेट्सच्या स्वच्छतेकडे लोक भर देताना दिसतात. मात्र हातातील स्मार्टफोन किंवा रिस्टबँडकडे साफ दुर्लक्ष केलं जातं. परिणाम सतत ओलावा किंवा घाम साचल्याने आणि अस्वच्छतेमुळे त्यावर बॅक्टेरिया वाढू लागतात.

अशी घ्या काळजी

रिस्टबँडवर बॅक्टेरियाची वाढ होवू नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

- यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. वेळोवेळी रिस्टबँड स्वच्छ करा.

- गरज नसताना किंवा सतत रिस्टबँड घालणं बदं करा.

- रिस्टबँड जास्त टाइट नसेल हे पहा.

- बँड निवडताना त्याची योग्य निवड करणं गरजेचं आहे. यासाठी ब्रिदेबल मटेरियल असलेला रिस्टबँड खरेदी करा.

हे देखिल वाचा-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT