hair colour 
लाइफस्टाइल

केसांना कलर केलयं, तर अशी घ्या काळजी

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - काही जणांसाठी केसांना रंग लावण्याचा शौक असतो. तर कुणांसाठी पांढरे केस लपवण्यासाठी  नाईलाजास्तव उचलेले पाऊल असते. आम्ही अशा लोकांविषयी बोलतो, जी आपले मूड आणि व्यक्तिमत्त्व चांगले दिसण्यासाठी केस कलर करण्याचा पर्याय निवडतात. नावीन्यपूर्ण हेअरस्टाईलसाठी वापरले जाणारे या रंगांचे सर्वसाधारणपणे केसांना हायलाईट केले जाते.

फंकी हेअर कलर्सचा वापर करताना या गोष्टींची काळजी घ्या
- तुम्हाला जर तुमचे केस आकर्षक दिसण्याबरोबरच चांगले दिसावे असे वाटत असेल तर जास्तीत-जास्त दोन फंकी कलर्सचा वापर करा.
- बाॅब, रेझर्ड लूक, असिमिट्रिकल कट आदी माॅर्डन हेअरकट्स वापरा. याने केस आणखी चांगले दिसतील.
- आऊट कलर्स आणि टोन्गिंगच्या मदतीने तुमचे फंकी कलर्ड केस स्टाईल करा.
- तुमच्या केसाचे काही स्ट्रेंड्सला फंकी कलर्सने रंगवून स्वतःचा लूक चांगला बनवा.

रंग लावल्यावर काळजी घ्या
जर तुम्ही तुमचे केस कलर करण्याचा निर्णय घेतला असेल तर काही नियम पाळा. तुमचे फंकी कलर दीर्घ काळासाठी टिकून राहील.

१. दररोज केस धुणे टाळा : केसांना दररोज शॅम्पू करु नका. केस धुतल्यावर मास्क किंवा कंडीशनरचा वापर करा. केसांना मास्क किंवा कंडीशनर लावल्यानंतर १० मिनिटांपर्यंत ते राहू  द्या.
२.रंगाचे संरक्षण करणाऱ्या उत्पादनाचा वापर करा : नेहमी कलर प्रोटेक्टिंग शॅम्पू, मास्क आणि सिरमचा वापर करा. याने केसांवरील रंग अधिक काळासाठी टिकून राहतील. ते लवकर फिक्के पडणार नाहीत.
३.केस कमी गरम पाण्यात धुवा : केस गरम किंवा फार गरम पाण्यात धुवू नका. हेअर कलर केमिकल्समुळे तुमचे केस फार संवेदनशील झालेले असतात.
४.स्टायलिंग टूल्सचा खूप जास्त वापर करु नका : केसांमध्ये जास्त उष्णता निर्माण करणारे स्टायलिंग टूल्सचा वापर करु नका. जसे की इस्त्री किंवा टाॅन्गिंग मशीन

५.स्वतःचे नेहमीचे स्पा ट्रीटमेंट बुक करा
- केसात दीर्घकाळ रंग टिकून राहावे यासाठी तुम्ही नेहमी वापरत असलेले रुटीन हेअर स्पा ट्रीटमेंट जरुर वापरा.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : दिलासादायक ! राज्यात पाऊस परतणार; कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात धो धो कोसळणार, १० जिल्ह्यांना येलो अलर्ट

Navratri Upvas Recipe: उपवासाला तेच तेच खाऊन कंटाळा आलाय? बनवा खमंग अन् चटपटीत 'उपवासाचा समोसा'!

Mangalwedha Crime : जवळ झोपून न देणाऱ्या पत्नीचा रॉकेलने पेटवून खून; पतीस शिक्षा

Mumbai Crime : सीएसएमटीतून चिमुरडीचे अपहरण! १४ तासांत शोध, अपहरण करणाऱ्या महिलेला अटक; एक वर्षाच्या मुलीला आईच्या स्वाधीन केले

FDA Crime : कऱ्हाडमधुन एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा; राज्यात अन्नसुरक्षेसाठी कारवाई आणखी कडक करणार

SCROLL FOR NEXT