Shravan 2024  esakal
लाइफस्टाइल

Shravan 2024 : भारताबाहेर असलेल्या भगवान शंकरांच्या या मंदिरात एका शापामुळे राजकन्या बनली देवी

Lord Shiv Temple In Indonesia :जिथे भक्त आहेत तिथे साक्षात देवही आहेत. भगवान शिव शंकरांचे एक अनोखे मंदिर इंडोनेशियामध्ये सुद्धा आहे. फार कमी लोकांना माहिती आहे.

सकाळ डिजिटल टीम

Lord Shiv Temple In Indonesia :

आजपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. आज देशातील प्रत्येक महादेव मंदिरात पूजा मांडली असेल. आणि तिथे भक्तांची गर्दी ही जमली असेल. श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास करून भगवान शंकरांचे दर्शन घेतल्याने अनेक समस्या सुटतात अशी भावना आहे. त्यामुळे, भगवान शंकरांच्या मंदिरात गर्दी होते.

भगवान विष्णूंचे भक्त जसे जगभर आहेत तसे ते भगवान शंकरांचे भक्त ही जगभर विखुरलेले आहेत. आणि जिथे भक्त आहेत तिथे साक्षात देवही आहेत. भगवान शिव शंकरांचे एक अनोखे मंदिर इंडोनेशियामध्ये सुद्धा आहे. फार कमी लोकांना माहिती आहे.

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपण इंडोनेशियामधील या महादेव मंदिराची माहिती घेणार आहोत. तुम्ही कधी इंडोनेशियाला गेलात तर या मंदिराला नक्की भेट द्या.

इंडोनेशियात दहाव्या शतकात बनलेले हे महादेवांचे मंदिर प्रम्बानन मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात महादेवांसोबतच दुर्गा मातेची सुद्धा मूर्ती विराजमान आहे. या मंदिराचा जागतिक वासरा स्थळांच्या यादीत समावेशही झाला आहे.

या मंदिरात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती आहेत. सर्व देवतांचे मंदिरे पूर्व दिशेला तोंड करून आहेत. या मंदिराच्या समोर ब्रह्मदेवांसाठी हंस, भगवंत विष्णूंसाठी गरुड आणि भगवान शंकरांसाठी नंदी उभे आहेत. या मंदिर परिसरात अनेक लहान-मोठी मंदिरेही आहेत.

भगवान शंकरांचे प्राचिन मंदिर

मंदिराची पौराणिक कथा काय आहे?

या मंदिराशी संबंधित एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी, इंडोनेशियातील जावा या शहरात प्रभु नावाचा एक दैत्य राजा होता. त्याला एक सुंदर मुलगी होती तिचे नाव रोरो जोंग्गरंग होते. या मुलीवर बांडुंग बोन्दोवोसो नावाचा एक व्यक्ती खूप प्रेम करायचा. पण राजकन्या रोरो हिला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते. तेव्हा तिने त्या व्यक्तीला एक अट घातली.

या व्यक्तीने एका रात्रीत हजार मूर्ती बनवाव्यात अशी अट तिने ठेवली. जर हे काम त्या बांडुंग बोन्दोवोसो याने पूर्ण केले तर ती त्याच्याशी लग्न करायला तयार होती.

बांडुग बोन्दोवोसो याने एका रात्रीत ९९९ मूर्ती बनवल्या. त्याची एक मूर्ती बनवायची राहीली होती. तेव्हा राजकन्येने गावाजवळील सर्व शेती पेटवली. कारण, तिला संपूर्ण गाव दिवस उजाडल्याप्रमाणे उजळून टाकायचे होते. तसेच झाले.

सर्वच शेती पेटल्याने दिवस उजाडल्यासारखेच वातावरण निर्माण झाले. बांडुग बोन्दोवोसो यालाही हे खरं वाटलं. पण त्याला सत्य समजले तेव्हा तो क्रोधित झाला अन् त्याने हजारावी मूर्ती होण्याचा शाप राजकन्येला दिला. ती राजकन्या जिवंत मूर्ती बनली अन् या महादेवांच्या मंदिरात तिची देवीच्या स्वरूपात पूजा केली जाऊ लागली, अशी कथा स्थानिक संस्कृतीत प्रचलीत आहे.   

इंडोनेशियात असलेले हे मंदिर स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना आहे. या मंदिर परिसरात चार मंदिरे आहेत. ज्याच्या मध्यभागी भगवान शंकरांचे मोठी मूर्ती असलेले भव्य मंदिर आहे. तर दुसऱ्या मंदिरात भगवान शंकरांचे शिष्य अगस्त्य ऋषी यांची मूर्ती आहे. तिसऱ्या मंदिरात माता पार्वतीची मूर्ती आहे आणि चौथ्या मंदिरात गणेशाची सुरेख मूर्ती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT