little chef esakal
लाइफस्टाइल

छोट्या शेफची भन्नाट पाककृती होतीय व्हायरल

तो या पदार्थाचा उल्लेख 'पसानिया' असा करत आहे.

नमिता धुरी

मुंबई : लहान मुलांचे जग वेगळेच असते. नवनवीन गोष्टी शिकण्याच्या ओढीने ही मुले वेगवेगळे प्रयोग करत असतात. अशाच एका लहानग्याने केलेल्या प्रयोगाची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. हा मुलगा आपला आवडता 'पसानिया' हा खाद्यपदार्थ तयार करत आहे. हा एक इटालियन खाद्यपदार्थ आहे.

चित्रफितीच्या सुरुवातीला हा मुलगा आपल्याला लसग्न आवडत असल्याचे सांगत आहे. यावेळी तो या पदार्थाचा उल्लेख 'पसानिया' असा करत आहे. संपूर्ण चित्रफितीमध्ये हा मुलगा आपण हा पदार्थ योग्यरितीने करत असल्याचे सतत आपल्या आईला विचारत आहे. त्याची आई त्याच्यावर लक्ष ठेवून आहे; पण लझानियाची बहुतांश पाककृती या मुलाने स्वत:च केली आहे.

चित्रफितीच्या शेवटी हा मुलगा स्वत: केलेल्या लझानियाचा आस्वाद घेताना दिसत आहे. यावेळी त्याने लझानियावर मोझेरेला चिझही घातले आहे. ३० मार्चला ही चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली होती. तेव्हापासून हा मुलगा आणि त्याचे लझानिया लोकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत १.४ दशलक्ष लोकांनी ही चित्रफीत पाहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सोलापूरसाठी मोठी भेट! शर्तभंग झालेल्या ‘या’ जागा होणार वर्ग-१; एका शासन निर्णयात १०० वर्षांपूर्वीचा प्रश्न मिटला, वाचा...

व्यापारी जहाजावर रशियन क्षेपणास्त्राचा भीषण हल्ला; चार भारतीय खलाशांचा मृत्यू, भारताकडून संताप

Pune News : शिफारशीच्या भरतीमुळे सुरक्षा यंत्रणा 'कमकुवत'; महापालिका आयुक्तांच्या उत्तराने नगरसेवकांची कोंडी

AC Local Close : हार्बर मार्गावरील सात एसी लोकल फेऱ्या रद्द! तांत्रिक बिघाडाचा फटका प्रवाशांना

Pali News : सुधागड तालुक्यातील कोशिंबळे धबधब्याच्या डोहात स्थानिक नागरिक बुडाला

SCROLL FOR NEXT