Liver Detox Drink esakal
लाइफस्टाइल

Liver Detox Drink: लिव्हर स्वच्छ करण्यात ऊसाच्या रसा एवढं बेस्ट कोणीच नाही! ट्राय तर करा...

sugarcane juice benefits: आजकाल फॅटी लिव्हरची समस्या लोकांमध्ये खूप दिसून येत आहे

Pooja Karande-Kadam

Liver Detox Drink : कडक उन्हामुळे सर्वजण अस्वस्थ होत आहेत. अशावेळी द्रवपदार्थ प्यायल्याने शरीर ताजेतवाने होते आणि शरीर हायड्रेटेड राहते. उसाचा रस हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम पेय आहे. ते प्यायल्याने शरीराला थंडावा तर मिळतोच शिवाय. किंबहुना यामुळे आपल्या आरोग्यालाही अनेक फायदे होतात.

आजकाल फॅटी लिव्हरची समस्या लोकांमध्ये खूप दिसून येत आहे. अशा वेळी उसाचा रस यकृतासाठी नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करतो. पण ते पिण्याची योग्य पद्धत जाणून घेणं गरजेचं आहे. अन्यथा उसाच्या रसामुळे सर्दी-खोकलाही होतो.

ऊसाच्या रसातील पोषक घटक

  • कॅलरीज: 183

  • साखर: 50 ग्रॅम

  • फायबर: 13 ग्रॅम

  • फ्लेव्होनॉइड्स अँटिऑक्सिडंट्स

  • फायबर

  • पोटॅशियम

यकृत डिटॉक्स करते

उसाचा रस यकृत डिटॉक्स करण्यास मदत करतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट घटक यकृतातील संसर्ग दूर करतात. यासोबतच ते यकृताची कार्य क्षमताही वाढवतात. कावीळमध्ये आराम मिळतो कावीळ यकृत निकामी झाल्यामुळे होते. काविळीमध्ये उसाचा रस खूप फायदेशीर आहे.

काविळीपासून वाचवते

शरीरात बिलीरुबिनचे प्रमाण वाढले की कावीळ होते. उसाचा रस बिलीरुबिनची पातळी राखतो. ज्यामुळे काविळीमध्ये आराम मिळतो. किडनी निरोगी ठेवते उसाचा रस देखील किडनी तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो. उसाचा रस विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि मूत्रपिंडाच्या संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतो. 

युरीन इन्फेक्शनमध्ये उपयोगी

ज्या लोकांना वारंवार युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो त्यांनी उसाचा रस प्यावा. यामुळे किडनी स्टोन वाढण्यासही प्रतिबंध होतो. पचनक्रिया योग्य ठेवते उसाच्या रसात भरपूर पोटॅशियम असते. यामुळे पोटाची पीएच पातळी कायम राहते.

पचनक्रीया सुधारते

उसाचा रस पचनासाठी आवश्यक असलेला रस योग्य प्रकारे काढण्यास मदत करतो. त्यामुळे अन्न सहज पचते. बद्धकोष्ठता दूर होते उसामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असते.

जे आतडे स्वच्छ करून बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते. एनर्जी आणि इम्युनिटी बूस्टर उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने शरीराला ऊर्जा` मिळते आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

लिव्हर डिटॉक्ससाठी उसाचा रस केव्हा प्यावा

  • जर तुम्हाला यकृत डिटॉक्ससाठी उसाचा रस प्यायचा असेल तर ते योग्य ठरेल.

  • उसाचा रस सकाळच्या एक तास अगोदर पिऊ शकतो.

  • दुपारी उसाचा रस जेवल्यानंतर सुमारे दोन तासांनी प्यावा.

  • मात्र संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर उसाचा रस अजिबात पिऊ नये.

  • या दोन वेळेस उसाचा रस प्यायल्याने यकृत डिटॉक्स होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026: Mumbai Indians च्या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं उचललं मोठं पाऊल; जगभरातील चाहत्यांना बसला धक्का, नेमकं काय केलं?

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

SCROLL FOR NEXT