Kolhapuri Chappals International Fashion Sakal
लाइफस्टाइल

Prada Kolhapuri Chappals: Prada ला लागला कोल्हापुरी चपलेचा नाद! रॅम्पवॉक नंतर झाली जगभरात हवा, किंमत किती?

Prada Kolhapuri Chappals Price in 2026: कोल्हापुरी चप्पल आता प्राडाच्या रॅम्पवर झळकली; पारंपरिक शिल्पकलेला मिळाली जागतिक ओळख!

Anushka Tapshalkar

Traditional Kolhapuri Chappals on Milan Runway: कोल्हापुरी चपलांचा इतिहास 12व्या-13व्या शतकात महाराष्ट्रात सुरू झाल्याचं मानलं जातं. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात या चपला अधिक प्रसिद्ध झाल्या. स्थानिक कातडी वापरून, पारंपरिक पद्धतीने हाताने तयार होणाऱ्या या चपला आजही देशभरात वापरल्या जातात. एकीकडे टिकाऊपणा आणि स्वस्त दरामुळे त्या लोकप्रिय असल्या, तरी आता त्याच चपला प्राडाच्या शोमध्ये हजारो डॉलर्सच्या किंमतीत पाहायला मिळाल्या आहेत.

कोल्हापुरीचा प्राडाच्या रॅम्पवर नाद

भारतीय परंपरेचा भाग असलेली कोल्हापुरी चप्पल आता थेट आंतरराष्ट्रीय फॅशन रॅम्पवर झळकली आहे. मिलान शहरात झालेल्या प्राडा (Prada) या जगप्रसिद्ध लक्झरी ब्रँडच्या Men’s Spring/Summer 2026 शोमध्ये कोल्हापुरी चप्पलला मानाचं स्थान देण्यात आलं.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर मियुच्चिया प्राडा आणि राफ सायमन्स यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या शोमध्ये “A Shift of Attitude — Dismantling of Meaning, and Dismantling Power” म्हणजेच ‘शक्ती आणि अर्थ यांचं विघटन’ या थीम अंतर्गत विविध प्रयोग झाले. तेव्हा अनेक भारतीयांचं लक्ष वेधलं ते शतकानुशतकं भारतीय पुरुषांच्या पायात असलेल्या पारंपरिक कोल्हापुरी चप्पलेनं जी आता उच्चभ्रू फॅशनच्या झगमगाटात झळकतेय.

लोकल ते ग्लोबल

गेल्या काही काळात आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर्स भारतीय पारंपरिक पोशाख, ॲक्सेसरीज आणि डिझाईन्सकडे वळताना दिसत आहेत. नेहरू जॅकेट, कुर्ते, अंगरखा, स्कार्फ आणि पगड्या यानंतर आता कोल्हापुरी चप्पलसारखा स्थानिक वारसा जागतिक स्टेजवर पोहोचतो आहे. विशेष म्हणजे, ही चप्पल प्राडाच्या शोमध्ये फक्त वापरलीच नाही, तर तिला एका विशिष्ठ पद्धतीने सन्मानित करण्यात आलं.

आगळंवेगळं निमंत्रणपत्र अन् चर्चेला उधाण

शोचं आमंत्रण एका साध्या पण स्टायलिश लेदर रिंगच्या स्वरूपात देण्यात आलं होतं, ज्यात कोल्हापुरी चपलींच्या पारंपरिक टोकाच्या लूपचा स्पष्ट संदर्भ होता. हा बारकावा अनेकांच्या लक्षात आला आणि त्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. काहींनी याला 'सांस्कृतिक कलेची स्तुती' म्हणून पाहिलं, तर काहींनी यावर ‘कल्चरल अ‍ॅप्रोप्रिएशन’ अर्थात 'परंपरेचा व्यावसायिक वापर' म्हणून प्रश्न उपस्थित केले.

भारतीय फूटवेअर डिझायनर अपराजिता तूर यावर म्हणतात, “कोल्हापुरी आमच्यासाठी फक्त फॅशन नाही, ती आमची परंपरा आहे. जागतिक ब्रँड्सनी याला दाद दिली, हे स्वागतार्ह आहे. पण या मागे जे हात आहेत, त्यांना प्रकाशझोत मिळणं गरजेचं आहे.”

किंमत

पण आपल्या याच वर्षानुवर्ष आणि नेहमीच्या वापरातील चपलेची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आपल्याकडे साधारण रु. ६०० मध्ये विकली जाणारी कोल्हापुरी चप्पल प्राडा मात्र £1000 म्हणजेच भारतीय रु. 1,16,996.90 इतक्या किंमतीला विकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलचे पहिले कसोटी शतक! रवींद्र जडेजासह मिळून वेस्ट इंडिजचा 'गेम' केला, रिषभची वाढवली धडधड

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवा अन् ४० लाखांचा फंड मिळवा, 'ही' स्कीम माहिती आहे का?

लगाच्या १२ वर्षानंतर घेतला घटस्फोट; आता मुलाचा एकट्याने सांभाळ करतेय मराठी अभिनेत्री; , म्हणते- त्याला माझी गरज...

Crime: वृद्ध महिलेचं ३५ वर्षीय मजुरासोबत प्रेमाचं सूत जुळलं; एकत्र राहण्यासाठी भयंकर कृत्य केलं, जे घडलं त्यानं कुटुंब हादरलं

"मुंज्या सिनेमा मराठीत बनणार होता पण.." दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा ; म्हणाला...

SCROLL FOR NEXT