How To Know Lovers Feeling After Expressing Ourself : प्रेमाचा गुंता हा वेगळाच असतो. पहिले तर आपल्याला वाटतंय ते प्रेम आहे हे ओळखायला वेळ लागतो. जर ते ओळखून स्वीकारलं तर व्यक्त करायला जमत नाही. कसं करावं हे समजत नाही. एवढं असताना हिंमत करून व्यक्त केलच तर पुढे काय? असा मोठा प्रश्न बहुतेकांना पडतो.
आपण आपल्या भावना व्यक्त केल्या पण समोरच्या व्यक्तीच्या मनात काय ते माहित नसतं. आपलं प्रेम स्वीकारलं जाईल की, नाकारलं? होकार मिळेल की, नकार? अशा अनेक शंकांनी डोकं दुखायला लागतं. तुमच्या याच प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी काही खास लव्ह टिप्स सांगत आहोत.
सरळ बोला
प्रेम व्यक्त करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे वाटतं ते स्पष्ट बोला. कोणतीही भावना आडून किंवा दडवून व्यक्त नका करू. तुमच्या भावना समोरच्याला थेट आणि स्पष्टपणे कळणं आवश्यक असतं. तसंच समोरच्या व्यक्तीलाही विचार करायला वेळ देत तिच्या / त्याच्या स्पष्ट भावना जाणून घ्या.
संवादाला सुरुवात करा पण दबाव टाकू नका
प्रेमाचं प्रकरण वाटतं तेवढं सोपं नसतं. समारून प्रपोजल आल्यावर बऱ्याचदा व्यक्ती गडबडते. सरळ नकार न देता दूर्लक्ष करातात, तिरस्कार करतात, चीडचीड करतात. बऱ्याचदा उत्तर कसं द्यावं हे समजत नसतं. काही वेळा संभ्रम असतो. अशात फार संयम ठेवणं आवश्यक असतं. स्वतःला आणि समोरच्याला वेळ द्या. जर वेळ देऊनही उत्तर येत नसेल तर समजा नकार आहे. मग या पुढे थांबणे हेच उत्तम.
होकारासाठी फक्त हो असा एकच शब्द असतो
सिनेमात नेहमी नकारात होकार समजला जातो, असं सांगतात. शांत राहणं म्हणजे होकार गृहित धरला जातो. पण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेच आहे की, प्रेमात होकार व्यक्त फक्त हो या एका शब्दानेच व्यक्त व्हावा. याशिवाय इतर कोणतेही शब्द किंवा देहबोली होकार समजणे चुकीचे ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.