Cheer Up Messages For Board Passed Students sakal
लाइफस्टाइल

Positive Messages For Students With Low Marks: कमी मार्क्स मिळाले म्हणून मुलं निराश? मग 'हे' प्रोत्साहीत करणारे मेसेजेस त्यांना नक्की पाठवा

How To Motivate Children After Board Exam Results: परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर मुलांचा आत्मविश्वास वाढवणारे प्रेरणादायक विचार जरूर शेअर करा.

Anushka Tapshalkar

Motivation For Students: आज इयत्ता १२वी चा निकाल जाहीर झाला. काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी निकाल जाहीर झाला आहे. अशातंच अनेक विद्यार्थी उत्कृष्ट मार्कांनी पास झाले आहेत तर काहींना कमी टक्केवारीत समाधान मानावे लागले.

पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, फक्त मार्क्स म्हणजेच यश नाही. आयुष्यात यश हे मेहनत, कष्ट आणि तुमच्या जिद्दीने मिळते. परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून कोणाचा आत्मविश्वास ढासळू नये आणि घरातील कुणीही त्यांचं मन दुखावू नये, याची काळजी घ्यायला हवी.

खास करून लहान मुलांना त्यांच्या प्रयत्नांना मान देऊन त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. शिकताना चुका होणं साहजिक आहे, पण त्या चुका समजून घेऊन पुढे जाणं महत्त्वाचं आहे. कुटुंबाचं प्रेम आणि साथ असेल, तर मुलं नक्कीच पुढे जाऊन यश मिळवू शकतात.

तुम्हालाही जर तुमच्या घरातील लहान मुलांना प्रोत्साहन द्यायचे असेल तर पुढे दिलेले प्रोत्साहित करणारे संदेश नक्की वापरा.

- तुम्ही किती वेळा पडलात याला महत्त्व नाही, महत्त्व आहे तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहिलात याला.

- यश म्हणजे अंतिम लक्ष्य नव्हे आणि अपयश म्हणजे शेवट नाही — प्रयत्न सुरू ठेवणं हेच खरे ध्येय आहे.

- ज्यांच्या वाट्याला अपयश येतं, त्यांना अनुभवही सर्वाधिक मिळतो.

- कमी गुण मिळाले म्हणून स्वप्नं सोडायची नाहीत, कारण मोठं व्हायचं मनापासून ठरवलं असेल तर वाट नक्कीच सापडते.

- तुमच्या मूल्याचं मोजमाप कोणत्याही मार्कशीटने करू शकत नाही.

- आता हरलो तरी चालेल, पण पुन्हा जिंकायचं हे मात्र विसरायचं नाही.

- वेळ लागेल, पण जर मनापासून प्रयत्न करत राहिलात, तर तुमचाही सूर्य उजाडेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train Route नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'चा मार्ग झाला जाहीर!

School Rules: शिक्षकांना करता येणार नाही विद्यार्थ्यांच्या रील, शिक्षण विभागाची नवी नियमावली

Latest Marathi News Live Update : गोवंडीमध्ये वंचितमध्ये नाराजी

Nashik Municipal Election : सिडकोत निकालाचा थरार! भाजपचे दुबार एबी फॉर्म प्रकरण गाजले; ५ जणांची उमेदवारी फेटाळली

Car Launch in 2026 : एकच झलक, सबसे अलग! 2026 वर्षांत लॉंच होणार 10 ब्रॅंड कार; परवडणारी किंमत अन् दमदार फीचर्स

SCROLL FOR NEXT