shrada-kapoor 
लाइफस्टाइल

प्लीटेड स्कर्टची बी-टाऊनमध्ये हवा

माधुरी सरवणकर

सध्या बी-टाऊनमध्ये प्लीटेड मिनी स्कर्टची फॅशन इन आहे. प्रियांकापासून मलायकापर्यंत सर्वजण हा ट्रेंड फॉलो करताना दिसतात. नुकताच ‘स्ट्रीट डान्सर’च्या प्रमोशनसाठी श्रद्धा कपूरने हा स्कर्ट घातला होता आणि यात ती अफलातून दिसत होती. या स्कर्टची कमाल अशी आहे, की तुम्हाला यावर घालण्यासाठी वेगळं काही खरेदी करण्याची गरज नाही. तुमच्या जुन्या कलेक्शनपैकी टी-शर्ट, डेनिम जॅकेट, हुडीजसुद्धा यावर भारी दिसू शकतात.  यामध्ये पीच, पिवळा, काळा, आकाशी, लाल, केशरी असे उठावदार रंग खुलून दिसतात. तुम्ही डेटवर जात असाल किंवा एखाद्या इव्हनिंग पार्टीसाठी हा पर्याय ‘लय भारी’ आहे.  

स्मार्ट लूकसाठी 
पार्टीला जायचं असल्यास मिनी स्कर्टवर तुम्ही क्रॉप टॉप, स्पेगेटी घालू शकता. 

या आउटफिटवर कोणताही वेस्ट बेल्ट छान दिसेल. याने तुमचा लूक अजून खुलेल. फक्त कॉन्ट्रास्ट रंगाचा बेल्ट वापरावा. 

बंद गळ्याचे मोठ्या बाह्याचे टी-शर्टही यावर झकास दिसतात. 

पॉइंटेड हिल्स, स्निकर्स वापरू शकता. ग्लॅमरल लूकसाठी ॲक्सेसरीज वापरलीच पाहिजेत. यासाठी नाजूक, लांब चेन गळ्यात घाला. हातात छान ब्रेसलेट किंवा वॉच घाला. केस मोकळे सोडा. स्लिंग बॅग वापरा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan on Epstein files : ‘मराठी माणूस पंतप्रधान होणार’ यावर पुन्हा पृथ्वीराज चव्हाणांनी केलं वक्तव्य, फुसका बार की मराठी पंतप्रधान?

'मी रक्तबंबाळ झालो, ७ वर्षांच्या लेकीला धक्का', पायलटची प्रवाशाला कुटुंबियांसमोर मारहाण

Mumbai Local Megablock: मुंबई लोकलनं प्रवास करताय? पण मेगाहाल होणार; पाहा कुठे अन् कोणत्या मार्गावर असणार मेगाब्लॉक?

UGC NET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तुमचा विषय कधी आहे?

Kolhapur Election : ‘सतेज पाटील आणि आमच्यातील दोरी तुटली’; हसन मुश्रीफांनी संभाव्य आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम

SCROLL FOR NEXT