Maharashtra Bendur 2023 esakal
लाइफस्टाइल

Maharashtra Bendur 2023 : बैलपोळा कधी आहे? जाणून घ्या महत्त्व आणि पौराणिक कथा!

बैलपोळ्यादिवशी स्त्रिया करतात चौसष्ट योगिनिंचे व्रत

Pooja Karande-Kadam

Maharashtra Bendur 2023 : आपल्या पुराणांमध्ये निसर्गातील प्रत्येक प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका खास सणाची निर्मिती करण्यात आलीय. बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे. कितीही तंत्रज्ञान विकसित झालं तरी देखील  शेती बैलाशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणूनच बैलांच्या प्रती असलेली भावना व्यक्त करण्यासाठी बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो.

महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील काही भागात उदा. कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो. हा सण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो. या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते. पोळ्याप्रमाणेच बैलांना सजवून मिरवणुका काढल्या जातात. संध्याकाळी कर तोडण्याचा कार्यक्रम असतो.

पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.

या दिवशी स्त्रियांचं असतं खास व्रत

पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात. दिवसभर उपवास करून सायंकाळी स्नान करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. घरातील मुलास अथवा मुलीस खीरपुरीचे जेवण देतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत ‘ अतित कोण ?’ असा प्रश्न विचारतात. आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे यासाठी पिठोरी अमावस्येला फक्त स्त्रियाच हे व्रत मनोभावे करतात.

बैल पोळा पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात धर्तीवर अवतरले होते तेव्हापासून कृष्णाचे मामा कंसने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावास्येचा होता. या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो.

कधी आहे बैलपोळा

शेतकऱ्याच्या दृष्टीने बैलपोळ्याला विशेष महत्त्व आहे. वर्षभर राबण्याऱ्या बैलांविषयी शेतकरी या दिवशी कृतज्ञता व्यक्त करतो. यंदा श्रावणी पिठोरी अमावस्या गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी सुरु होईल. तर शुक्रवारी १५ सप्टेंबर सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी होईल. बैलपोळा १४ सप्टेंबर गुरुवारी साजरा करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT