लाइफस्टाइल

खणाचा ड्रेस!

ऋतुजा कदम

पूर्वी मुली खणाची परकर पोलकी घालायच्या, तसेच खणाची नऊ तुकड्यांची चोळी हा खास पोशाख असायचा. साध्या काठाच्या कॉटनच्या साडीवर खणाचे ब्लाऊज हे पूर्वीपासूनचं अप्रतिम समीकरण आहे. गावात अजूनही अनेक महिला खणाची पोलकी घालताना दिसतात. अस्सल मराठमोळा पोशाख असणाऱ्या खणानं पुन्हा एकदा फॅशनच्या जगात प्रवेश केला आहे. श्रावणाला सुरुवात झाली असून, याच पार्श्‍वभूमीवर खणाच्या ड्रेसची फॅशन कशी करता येईल याविषयी जाणून घ्या! 

गेल्या काही वर्षांमध्ये खणाची साडी पाहायला मिळत आहे. त्यामध्ये अनेक प्रकार, डिझाईन आणि वेगळेपण येत आहे. शिवाय खणाच्या कापडाच्या कुर्तीदेखील फॅशनमध्ये एक आकर्षण बनलं आहे. पारंपरिक ड्रेस विकत घेणं किंवा तयार करणं कठीण काम असतं. मात्र, कमी बजेटमध्ये खणाच्या कापडाचा ड्रेस तुम्ही स्वत: डिझाइन करू शकता. आता खणाच्या या ड्रेसना अनेक मराठमोळ्या अभिनेत्रींची पसंती आहे. श्रावण महिना सण-उत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावणी सोमवार, मंगळवार, मंगळागौरीची पुजा, हळदीकुंकू, नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि यालाच जोडून गणेशोत्सव असे अनेक सण श्रावणात येतात. त्यासाठी मराठमोळा पारंपरिक वेशभूषेचा प्रकार म्हणजेच खणाचा ड्रेस, हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. 

  1. खणाचे कापड घेऊन तुमच्या पसंतीनुसार त्याचा टॉप शिवून घेता येईल. 
  2. कुर्ता, जीन्सवरील टॉप किंवा अखंड ड्रेस खणाच्या कापडामधून डिझाइन करू शकता. 
  3. सध्या खणाच्या अॅंकल लेंथ ड्रेसची फॅशन ट्रेंडमध्ये आहे.
  4. पारंपरिक पेहराव, ट्रेंड, आराम आणि कोणतीही मेहनत न करता तुम्ही फॅशन कॅरी करू शकता.
  5. खणाची डिझाइन आणि रंग तुमच्या ड्रेसला सगळ्यांपेक्षा 
  6. सर्वांचे लक्ष वेधून घेईल. 
  7. खणाचे शॉर्ट टॉप किंवा ट्युनिक्स शिवूनही त्यातून छान फ्युजन कलेक्शन तयार होऊ शकते.
  8. धारवाडी खणाला सध्या भरपूर मागणी आहे. त्यातील हिरवा, निळा, भगवा, जांभळा, हळदी, लाल, तपकिरी असे भडक रंग पाहायला मिळतात.
  9. ऑक्सिडाइज्ड किंवा सिल्व्हर दागिने यावर खुलून दिसतील. खणाच्या कापडाचा रंग लाल किंवा हिरवा असल्यास मोत्याचे दागिने उठून दिसतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT