Mahashivratri Rangoli Designs 2024 esakal
लाइफस्टाइल

Mahashivratri Rangoli Designs 2024 : महाशिवरात्रीला करा शंकर-पार्वतीचे स्वागत, अंगणात काढा ‘या’ सोप्या आणि आकर्षक रांगोळ्या

Mahashivratri Rangoli Designs 2024 : महाशिवरात्री ही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदा ८ मार्चला देशभरात ही महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Mahashivratri Rangoli Designs 2024 : महाशिवरात्री ही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदा ८ मार्चला देशभरात ही महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला ही महाशिवरात्री साजरी केली जाते.

भगवान शंकर आणि पार्वतीला ही महाशिवरात्री समर्पित आहे. या दिवशीच महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता, असे मानले जाते. त्यामुळे, या दिवसाला विशेष महत्व आहे.

महाशिवरात्रीला शंभू महादेव आणि देवी पार्वती यांची विधीपूर्वक पूजा केली जाते. महाशिवरात्रीचे व्रत केले जाते. घरोघरी रांगोळ्यांची आरास केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला तुमच्या अंगणात महादेवाला समर्पित असणाऱ्या रांगोळ्या काढायच्या असतील तर, त्यासाठीच्या डिझाईन्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे, हा लेख शेवटपर्यंत वाचा. (Mahashivratri 2024)

त्रिशूळची आकर्षक रांगोळी

भगवान शंकराचे आयुध म्हणून त्रिशूळाला अतिशय महत्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवाचे शिवलिंग आणि त्रिशूळाची सुंदर रांगोळी काढू शकता. शिवाय, विविध प्रकारच्या रंगांचा आकर्षक वापर करू शकता.

त्रिशूळासोबतच तुम्ही शिवलिंग, नंदी आणि इतर धार्मिक चिन्हांचा रांगोळीमध्ये वापर करू शकता. या व्यतिरिक्त रांगोळीला अधिक सजवण्यासाठी तुम्ही विविध प्रकारच्या फुलांचा ही वापर करू शकता. (Mahashivratri trishul rangoli Design)

शिव-पार्वतीची रांगोळी

महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाल भव्य आणि तितकीच आकर्षक रांगोळी काढायची असेल तर तुम्ही या प्रकारची शिव-पार्वतीची रांगोळी काढू शकता. यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी लहान आकारातील शिवलिंग काढा.

आता त्याच्या भोवती शिव-पार्वतीची रांगोळी काढा. हे काढायला जरा तुम्हाला कठीण जाऊ शकते. मात्र, यामुळे रांगोळी अधिक भव्य आणि आकर्षक दिसेल. आता या रांगोळीमध्ये तुम्ही विविध रंगाचा वापर करू शकता यामुळे, तुमची रांगोळी शोभून दिसेल. यात काही शंका नाही. (shivparvati rangoli design)

शिवलिंगाची सुंदर रांगोळी

जर तुम्हाला देवघराजवळ किंवा तुमच्या अंगणात महाशिवरात्रीनिमित्त छोटीशी मात्र तितकीच सुंदर रांगोळी काढायची असेल तर रांगोळीची ही डिझाईन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही ही शिवलिंगाची आकर्षक रांगोळी काढू शकता.

या शिवलिंगाच्या भोवती तुम्ही बेलाची पाने, त्रिशूळ आणि इतर धार्मिक चिन्हे देखील काढू शकता. यासोबतच विविध प्रकारच्या फुलांचा आणि रंगाचा वापर तुम्ही या रांगोळीत करू शकता. (Mahashivratri shivling rangoli design)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT