Mahavir Jayanti 2024 Sakal
लाइफस्टाइल

Mahavir Jayanti 2024: महावीर जयंतीनिमित्त जाणून घ्या भगवान महावीरांचे पाच सिद्धांत

Mahavir Jayanti 2024: महावीर जयंती हा जैन धर्मातील लोकांचा मुख्य सण आहे.

Puja Bonkile

भगवान महावीर स्वामी हे जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर होते. जैन धर्मात महावीर स्वामींची पूजा केली जाते. त्यांना विशेष महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार महावीरजींचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला झाला होता. हा दिवस महावीर जयंती म्हणून साजरा केला जातो. महावीर जयंतीचे महत्त्व जाणून घेऊया.

महावीर स्वामींचा जन्म इ.स.पूर्व 599 मध्ये झाला. हा त्यांचा २६२२ वा वाढदिवस असेल. पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष त्रयोदशी 20 एप्रिल रोजी रात्री 10:41 वाजता सुरू होत आहे आणि 22 एप्रिल रोजी दुपारी 1:11 वाजता समाप्त होईल. उदय तिथीचे महत्त्व देत 21 एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी केली जाणार आहे.

महावीर जयंतीचे महत्व

महावीर जयंतीच्या दिवशी जैन धर्मीय लोक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या दिवशी ते धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात आणि भगवान महावीरांची मनोभावे पूजा करतात. महावीर यांनी ज्ञानप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली होती. कठोर तपश्चर्या केल्यावर त्यांना वर्धमानातून महावीर म्हटले गेले.

  • जैन धर्माची तत्त्वे

जैन धर्माची पाच मुख्य तत्त्वे आहेत. यामध्ये सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय आणि ब्रह्मचर्य यांचा समावेश होतो. महावीर यांनी अहिंसेचा संदेश दिला होता.

ते सत्यालाही महत्त्व देतात. जीवनात नेहमी सत्याचे पालन केले पाहिजे. अपरिग्रह म्हणजे माणसाने लोभी नसावे. ही भावना संपत्ती, पैसा आणि वस्त्र यांची प्राप्ती दूर करते.

अस्तेय म्हणजे चोरी करू नये. जैन धर्माच्या शिकवणीतही याचा समावेश आहे. चोरीचा विचारही मनात आणू नका. महावीर यांनी ब्रह्मचर्य हे तत्व मानले आहे. याचा अर्थ सदाचारी जीवन जगणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT