व्यवसाय हा समाजातील घटकांशी संवाद करावा लागतो. हे कोणत्याही व्यावसायिकाला चुकत नाही. समाज किंवा कुटुंब एका सामाजिक व कौटुंबिक मूल्यांनी घट्ट जुळलेला असतो. या मूल्यांना तो जीवनभर आपले ध्येय मानून जीवन जगत असतो. व्यवसाय हा केवळ ग्राहकांकडून पैसा घेणे व आपला माल त्यांना विकणे हा व्यवहार नसतो.
हॅव्हेल्स अँड लॉईडने हे मूल्य पहिल्यापासून जपले आहे. या मूल्यांना एक ध्येय मानून आमची प्रगती सुरू आहे. आमच्या कंपनीने तयार केलेल्या वस्तू किंवा उपकरणाची ग्राहकाच्या घरातील स्थान हे एका वेगळ्या मूल्यांच्या नात्याची साक्ष देत असते. त्याचा एक उद्योजक किंवा व्यावसायिक म्हणून मनाला खूप समाधान देणारे आहे.
केवळ वस्तूंची विक्री करताना नव्हे तर या वस्तू किंवा उपकरणांची जाहिरात करताना सुद्धा आपण कोणत्या कार्यक्रमाची प्रायोजकत्व स्वीकारतो, यावरसुद्धा आमचे कंपनी म्हणून लक्ष असते. आज टीव्हीवर विविध प्रकारच्या मालिका किंवा रिअॅलिटी शो सुरू असतात.
एक व्यावसायिक म्हणून कोणत्याही कार्यक्रमाचे प्रायोजकत्व आपण स्वीकारले तर कुणी काही म्हणणार नाही. परंतु जेव्हा कौटुंबिक मूल्यांचे निर्बंध स्वीकारतो, तेव्हा कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारताना सुद्धा कार्यक्रमाची निवड अत्यंत सचोटीने करण्याची गरज आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे आम्ही प्रायोजकत्व स्वीकारले नाही. परंतु एका वेगळ्या बाजूने आम्ही या मालिकेचा एक भाग झालो आहेत. या मालिकेतील मुख्य भूमिका करणाऱ्याला हॅव्हेल्स अँड लॉईड कंपनीची डीलरशिप देण्याचा भाग या मालिकेत आहे.
तारका मेहता का उल्टा चष्मा गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण कुटुंबात अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. इतक्या वर्षानंतरही या मालिकेने कौटुंबिक मूल्यांना कसे राखता येईल, यावर विविध प्रकारे मालिकांचे भाग केले.
यामुळे या मालिकेत कुठेही आपल्या प्रथा परंपरांना कुठे धक्का लागत नाही. यामुळे आमच्या कंपनीने अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला. याचे अत्यंत चांगले स्वागत झाले. त्यामुळे या मालिकेचे प्रायोजकत्व न स्वीकारताही या मालिकेत हॅव्हेल्स अँड लॉईड या कंपनीची कार्यपद्धती व ज्या मूल्यांना कंपनी आपले ध्येय मानते. हे ग्राहकांना अत्यंत योग्य व चपखलपणे सांगण्यात आम्ही यशस्वी झालो.
आम्ही आमच्या कंपनीचे डीलरशिप घेणाऱ्यांचा सुद्धा अत्यंत आदर करतो. एवढेच नव्हे तर त्यांच्या काही योजना राबविल्या जातात. जशा मेडिक्लेम सारख्या सुविधा दिल्या जातात. ते आमच्या कंपनीचे थेट नोकरदार नसले तरी आमच्या कंपनीशी त्यांचे एक अतूट नाते तयार झालेले असते.
आमच्या कंपनीच्या संस्थापकांनी या मूल्यांना कंपनीच्या सुरूवातीच्या काळापासून जपले आहे. हेच मूल्य आपल्याला तारक मेहता का उल्टा चष्मा यात सुद्धा पाहायला मिळते. टेलिव्हिजनच्या इतिहासात या प्रकारचे असोसिएशन कुणी केले नाही.
हे केवळ एका भागापुरते नाही तर ही दीर्घकालीन संबंध या मालिकेशी राहणार आहे. आम्ही एक सहकारी म्हणून विश्वास ठेवतो. त्याचे प्रतिसाद आपल्याला मिळते. यातून ब्रँड निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याकडून आम्हाला तेवढेच प्रतिसाद मिळत आहे.
हॅव्हेल्स अँड लॉईडसाठी संपूर्ण देश हा आमच्यासाठी बाजारपेठ आहे. परंतु आमच्या कंपनीला गुजरात व महाराष्ट्राला अधिक फोकस करण्याचा प्रयत्न करीत आहे.
आमचे स्वतःचे उत्पादन युनिट
हॅव्हेल्स अँड लॉईड एक ब्रँड म्हणून नावारूपाला येण्यामागे आमचे स्वतःचे उत्पादन युनिट आहे. आम्ही दुसऱ्याकडे उत्पादने उत्पादित करून घेत नाही. अनेक कंपन्या उत्पादने दुसऱ्यांकडून उत्पादन करून घेतात.
आपले फक्त ब्रँड लावून विकतात. यापासून हॅव्हेल्स दूर आहे. प्रत्येक उत्पादनाचे हॅव्हेल्सचे स्वतःचे उत्पादन युनिट आहे. त्यामुळे ग्राहकाच्या गरजेनुसार आम्ही उत्पादनात तत्काळ बदल करू शकतो. यामुळे आपल्या उत्पादनांच्या गुणवत्तेवर आमचे नियंत्रण राहते. समजा गुजरातमध्ये या गुणवत्तेचे उत्पादन ग्राहकांना पाहिजे असल्यास तत्काळ आम्ही कारखान्यातून तसे बदल करून उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देऊ शकतो.
कारण भारत हा खूप मोठा देश आहे. यात जम्मू व काश्मीरच्या ग्राहकाला आवश्यक असलेली बाब पूर्वोत्तर राज्यातील ग्राहकांना राहणार नाही. त्यामुळे या दोन्ही ग्राहकांना असलेला बदल आम्ही उत्पादनांमध्ये तत्काळ करू शकतो.
आम्ही असे करीत नाही. चीनमधून उत्पादने आणत आहोत व येथे आपल्या कंपनीचे लेबल लावून विकण्याचा धंदा हॅव्हेल्सने कधी केला नाही. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास नेहमीच आमच्या बाजूने राहिला आहे. यामुळे इलेक्ट्रीक उत्पादने घेणारा
ग्राहका हा दुकानदाराला हॅव्हेल्सचे प्रॉडक्ट आहे काय हे विचारतो. यामागे आम्ही तयार केलेली विश्वासनीयता आहे. ही विश्वासनीयता एका दिवसात तयार नाही. यासाठी सातत्याने यासाठी प्रयत्न करीत ग्राहकांच्या गरजा व क्षमता लक्षात घेऊन उत्पादने तयार केली जात आहेत.
त्यामुळे आम्ही केवळ २० सेकंदात एक एसी तयार करतो, तर ३० सेकंदात एक वॉशिंग मशिन तयार करण्याची आमची क्षमता आहे. हे करताना आम्ही वेगवेगळे प्रयोगही उत्पादनात करीत आहोत. नवा टीव्ही आम्ही बाजारात आणत आहोत.
यात टीव्हीच्या रिमोटची आपल्याला गरज नाही. टीव्हीशी ग्राहक थेट संवाद साधू शकतील. कोणते चॅनेल पाहिजे, किती मोठा आवाज पाहिजे, स्क्रीन किती ब्राईट पाहिजे, हे बसल्याजागी घरातील व्यक्ती टीव्हीला आदेश देऊ शकेल व त्याप्रमाणे टीव्ही तुमच्या आवाजाची तालीम करेल. त्यामुळे तुम्ही म्हणून शकाल की, बोलणारा टीव्ही आता घरात येणार आहे.
आता सणासुदीचे दिवस येत आहे. यात नव्या प्रकारचे लायटिंगचे उत्पादने हॅव्हेल्स बाजारात आणणार आहे. चीनमधील एलईडी लाइट घेण्याची ग्राहकांना गरज नाही. चीनच्या उत्पादनामध्ये काय होते, सिरीजमधील एखादा लाइट जरी खराब झाला तरी तुम्ही संपूर्ण सिरीज खराब होते.
आम्ही जी सिरीज बाजारात आणत आहोत, यात सिरीजमधील बल्ब खराब होण्याची शक्यता राहणार नाही. एखादा बल्ब खराब झाला तरी बाकी सिरीज सुरू राहील. बल्ब खराब झाला तरी या सिरीजसोबत अतिरिक्त बल्ब ग्राहकांना दिले जाणार आहे.
त्यामुळे एखादा बल्ब खराब झाला तरी त्याची सिरीज मात्र सुरुच राहील. ही लायटिंग सिरीज दीर्घ काळ सुरू राहील. यामुळे ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. एवढेच नव्हे सोलरमध्ये सुद्धा काही उत्पादने आम्ही आणत आहोत. हे सर्व उत्पादने देशातच निर्माण करण्यावर आमचा भर असतो.
ग्राहकांच्या या प्रेम व विश्वासामुळे आम्ही आता देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा बाजारपेठ काबीज करीत आहोत. आखाती देशात व अमेरिकेत यापूर्वी पाय रोवले आहेत. परंतु आता गुणवत्तेच्या बाबत अधिक जागरूक असलेल्या युरोपीय देशांमध्ये सुद्धा हॅव्हेल्सने जम बसविला आहे. यामुळे गुणवत्तेबाबत हॅव्हेल्स तडजोड करीत नाही, हे यामुळे स्पष्ट झाले आहे. यामुळे ग्राहकांना उत्पादने देताना कौटुंबिक मूल्ये जपताना गुणवत्तेमध्ये तडजोड न करणे हे आमचे ध्येय आहे.
- सुरेश भुसारी, नवी दिल्ली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.