Bhogi Special Amsula Kadhi  Esakal
लाइफस्टाइल

Makar Sankranti 2024: भोगी स्पेशल पारंपरिक पद्धतीने आमसुलाची कढी कशी तयार करायची?

खान्देशात ताकाच्या कढीइतकीच आमसुलाची कढीही खास असते.

सकाळ डिजिटल टीम

Bhogi Recipe : खान्देशात ताकाच्या कढीइतकीच आमसुलाची कढीही खास असते. भरीत जेव्हा केलं तेव्हा ही कढी लागतेच. कारण येथे भरीत केलं तर कळण्याची पुरी किंवा कळण्याची भाकरी , मिरची भजी आणि कोशिंबीर केली जातात.

हे जड जेवण पचण्यास आमसुलाची कढी केली जाते. आजच्या लेखात आपण भोगी स्पेशल पारंपरिक पद्धतीने आमसुलाची कढी कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य

● आठ ते दहा आमसूल

● एक चमचा ज्वारीचं पीठ

● एक चमचा बेसन पीठ

● जिरे

● लसूण आल्याची पेस्ट

● गूळ 

● तेल  

कृती:

सर्वप्रथम आमसुलं दोन तास कोमट पाण्यात भिजवावी. मग हे आमसुलं मिक्सरमधे छान वाटून घ्यावीत. आमसुलाच्या या वाटणात मग पाणी घालावं.

ज्वारीचं आणि बेसनपीठ यात कालवून घ्यावं. कढईत तेल गरम करावं. तेलात आलं लसणाची पेस्ट घालावी.

जिरे घालावेत आणि आमसुलाच्या पाण्याचं मिश्रण घालावं. कढी उकळली की मग त्यात मीठ आणि गूळ घालावा.

मीठ आणि गूळ कढीत चांगला मिक्स झाला की मग एका छोट्या कढल्यात थोडं तेल गरम करावं. त्याला हिंग आणि जिऱ्याची फोडणी द्यावी.

ही आमसुलाची कढी चवीला उत्तम आणि पचन करण्यास मदत करणारी असते. जड जेवण झाल्यावर जळजळ होवू नये म्हणून  ही कढी खास करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT