लाइफस्टाइल

Makar Sankranti 2024 : लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीला या चुका टाळा, अन्यथा नात्यात येईल दुरावा

चला जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे आहेत जी चुकूनही करू नयेत.

Aishwarya Musale

मकर संक्रांत हा सनातन धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. वर्षातील पहिला सण असण्यासोबतच हा दान आणि उपासनेसाठीही विशेष सण मानला जातो. यावर्षी मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारी 2024 रोजी साजरा केला जाणार आहे.

लग्नानंतर प्रत्येक सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. तसेच मकर संक्रातीचा सण देखील मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास अशुभ परिणाम मिळू लागतात. चला जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे आहेत जी चुकूनही करू नयेत.

1. मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते. तसेच या दिवशी तुळस तोडू नये. असे करणे अशुभ मानले जाते.

2. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणासाठीही चुकीचे शब्द वापरू नयेत आणि कोणावरही रागावू नये. कठोर बोलणं टाळावं. समोरचा नाराज होईल त्याचं मन दुखावेल अशा गोष्टी करू नये. हा नियम सर्व दिवसांसाठी तुम्ही लागू करु शकता.

3. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा वाद होईल अशी कृती करू नका. वाद केल्याने काहीही साध्य होत नाही. त्यामुळे वाद करणं टाळा. यामुळे तुमचे नाते देखील खराब होईल.

4. सर्वांना मकर संक्रातीच्या दिवशी प्रेमानं भेटावं. त्यांच्याशी गप्पा गोष्टी कराव्यात. तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर त्याबाबत इतरांशी चर्चा करुन त्यावर मार्ग काढावा.

5. नववधु म्हटल्यावर सर्वांच्या नजरा तुमच्यावर असतात त्यामुळे तुमच्या वागण्याने कोणाला त्रास होईल असं वागू नका. एकमेकांना समजून घ्या.

भोजन दान करणे 

मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करणे अत्यंत शुभ असते, अशी अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करण्यापूर्वी काहीही खाऊ नये. गंगेत स्नान केल्यानंतर गरीब ब्राह्मणांना काहीतरी द्या, त्यांना खाऊ घाला. त्यांनी जेवल्यानंतरच तुम्ही अन्न खा. यामुळे तुम्हाला देवतांचा आशीर्वाद मिळेल

मांसाहार करू नये 

ज्योतिषांच्या मते, मकर संक्रांतीच्या दिवशी धूम्रपानासारख्या गोष्टी टाळा. हवं तर तीळ आणि मुगाची खिचडी बनवून खाऊ शकता. या दिवशी मांसाहार करू नये. शाकाहारी अन्न खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor मधील शूरवीरांचा सन्मान! १६ BSF सैनिकांना शौर्य पुरस्कार, पाहा संपूर्ण यादी अन् 'या' योद्ध्यांचा शौर्यसंग्राम

Virat Kohli - Rohit Sharma यांचं वनडेतील करियरही संपलं म्हणणाऱ्यांना सुरेश रैनाची चपराक; म्हणाला, ते महत्वाचे आहेत कारण...

Imtiaz Jaleel mutton chicken party: स्वातंत्र्यदिनी जलील यांच्या घरी होणार मटण-चिकन पार्टी; आयुक्तांसह थेट मुख्यमंत्र्यांना निमंत्रण!

Instagram Picks : इंस्टाग्राममध्ये ‘पिक्स’ फीचरची एन्ट्री; एकदम भारी अन् गेमचेंजर, एकदा बघाच

Latest Marathi News Updates: संस्थेने सेवेतून कमी केल्याने कर्मचाऱ्याचे तीन दिवसापासून उपोषण

SCROLL FOR NEXT