लाइफस्टाइल

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांती 14 किंवा 15 जानेवारीलाच का येते? जाणून घ्या कारण

मकर संक्राती हा एकमेव सण 14 किंवा 15 जानेवारीलाच का येतो?

Aishwarya Musale

2024 वर्षाला नव्या उत्साहात सुरूवात झाली आहे. नव्या वर्षाचा आनंद द्विगुणीत करणारा नव्या वर्षाचा पहिला सण लवकरच येणार आहे. धार्मिक दृष्टिकोनातूनही नवीन वर्ष अनेक अर्थांनी खास आहे. वर्षाचा पहिला महिना जानेवारी असतो आणि या महिन्यात अनेक उपवास आणि सण असतात. यातील मकर संक्रांत हा हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण आहे.

संक्रांतीच्या तारखेबाबत काही वेळेस संभ्रम निर्माण होतो. कधी 14 तर कधी 15 जानेवारीला मकर संक्रांती येते. पण तुम्हाला माहित आहे का मकर संक्राती हा एकमेव सण इंग्रजी कॅलेंडरनुसार 14 किंवा 15 जानेवारीलाच का येतो? हिंदू धर्मग्रंथांमध्ये तसेच खगोलशास्त्रानुसार मकर संक्रांतीबाबत जाणून घ्या.

मकर संक्रांती 14-15 जानेवारीलाच का?

मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा धनु राशीपासून मकर राशीत संक्रमणाचा काळ आहे. मकर संक्राती हा एकमेव सण इंग्रजी कॅलेंडरनुसार 14 किंवा 15 जानेवारीलाच का येतो? भारतात प्रचलित सर्व हिंदू कॅलेंडर चंद्रावर आधारित आहेत, म्हणूनच हिंदू सणांच्या इंग्रजी तारखा बदलत राहतात.

सध्या वापरात असलेल्या कॅलेंडरला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतात, जे सौर कॅलेंडर आहे, म्हणजेच सूर्यावर आधारित कॅलेंडर आहे. मकर संक्रांती हा एक सण आहे जो पृथ्वीपेक्षा सूर्याच्या स्थितीनुसार साजरा केला जातो. म्हणूनच चंद्राच्या स्थितीत थोड्या प्रमाणात फेरफार झाल्यामुळे हा सण कधी 14 जानेवारीला तर कधी 15 रोजी येतो. सूर्याच्या मुख्य भूमिकेमुळे इंग्रजी तारीख बदलत नाही.

भारतातील विविध राज्यांमध्ये साजरा

मकर संक्रांती हा असा सण आहे, जो भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक नावांनी आणि अनेक प्रकारे साजरा केला जातो. उत्तर भारतात याला मकर संक्रांत, तामिळनाडूमध्ये पोंगल तर गुजरातमध्ये उत्तरायण म्हणतात.

आसाममध्ये याला माघी बिहू आणि कर्नाटकमध्ये सुग्गी हब्बा, केरळमध्ये मकरविक्लू आणि काश्मीरमध्ये शिशु संक्रांत म्हणतात. हा सण केवळ भारतातच नाही तर नेपाळ आणि बांगलादेशसारख्या शेजारील देशांमध्येही साजरा केला जातो. लोक वेगवेगळ्या धार्मिक मान्यतांनुसार हा उत्सव साजरा करतात, परंतु या सणामागे एक खगोलीय घटना आहे.

मकर संक्रांती कधी आहे?

2024 या वर्षात मकर संक्रांती 15 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. गेल्या दोन वर्षांपासून मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारीलाच साजरा केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Travel Guide : अनवट संस्कृतीचे दर्शन! आसाम आणि मेघालयचा प्रवास म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीचा अनुभव

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT