Makar Sankranti Fashion
Makar Sankranti Fashion esakal
लाइफस्टाइल

Makar Sankranti Fashion: आता साडीशिवाय करा ट्रॅडिशनल लुक...ही फॅशन स्टाइल बघितलीत का?

सकाळ ऑनलाईन टीम

Makar Sankranti Fashion: दरवर्षी १४ जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाते, यादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीला काळे कपडे घालावे असं म्हणतात. नवीन सुनेचे लहान मुलाचे हलव्याचे दागिने आणि काळे कपडे घालून फोटो सुद्धा काढले जातात. मात्र मुलींसाठी मार्केटमध्ये आलेला कुर्तीचा हा नवा ट्रेंड तुम्हाला माहितीये का?

संक्रांतीच्या दिवशी बायकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा असतो. कॉलेजच्या मुली सुद्धा काळे ड्रेसेस घालून फोटोशूट करत असतात. पण प्रत्येकवेळी संक्रांत म्हणून साडीच नेसली पाहिजे असं काही नाही.. तुम्ही या फॅशनेबल कुर्ती सुद्धा वापरू शकतात.

तसं यावर्षी मकर संक्रांती रविवारी आलेली आहे त्यामुळे तसं म्हटलं तर ऑफिसमध्ये संक्रांती सेलिब्रेट करण्याचा प्लॅन हुकला आहे.. पण तुम्ही हाच प्लॅन सोमवारीही करू शकतात आणि साडी नेसली की काम करायला त्रास होतो असा प्रश्नही सुटेल

१. खण कुर्ता

गेल्या काही वर्षांपासून खणाचे कुर्ते बाजारात दिसता आहेत, आणि अर्थात ते प्रत्येकाच्या मनात घर करता आहेत. तुम्हीही संक्रांतीसाठी काळे खणाचे कुर्ते घालू शकतात, सध्या खणाच्या काठात टिपिकल रंग सोडून जरा वेगळे आणि ब्राइट रंग सुद्धा आलेले आहेत. यावरती तुम्ही ऑक्सिडाईज ज्वेलरी सुद्धा घालू शकतात. (Trends)

२. पैठणी जॅकेट आणि कुर्ता

प्लेन ब्लॅक कुर्ता आणि त्यावरती पैठणीचे किंवा ब्रॉकेटचे जॅकेट हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं. सध्या तसेही पैठणी जॅकेट खूप ट्रेंडिंग आहेत. तुम्हीही हे जॅकेट ट्राय करू शकतात. यावरती नुसते कानातलेसुद्धा सुंदर दिसतील.

३.लॉन्ग कुर्ता

लॉन्ग कुर्ते कधीही सुंदर दिसतात, सध्या फ्लोरल कुर्त्यांची, इकतच्या कुर्त्यांची खूप फॅशन सुरू आहे. फक्त कॉटनचेच नाही तर इतरही कुर्ते बाजारात आले आहेत. तुम्हीही तुम्हाला आवडणाऱ्या फॅब्रिकचे कुर्ते ट्राय करू शकतात. (Fashion Trend)

४. एम्ब्रोडरी कॉटन कुर्ता

एम्ब्रोडरीचे कुर्ते दिसायला खूप सुंदर दिसतात, काळ्या रंगाचा पूर्ण कुर्ता आणि त्यावरती लाल, निळ्या, जांभळ्या, पिवळ्या अशा ब्राइट रंगाची एम्ब्रोडरी. हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं. जर तुम्हाला बारीक नक्षी असलेले ड्रेसेस आवडत असतील तर हे कुर्ते परफेक्ट आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT