Makar Sankranti 2024  esakal
लाइफस्टाइल

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला ‘या’ सोप्या आणि आकर्षक रांगोळ्या, वाढवतील तुमच्या अंगणाची शोभा!

अवघ्या २ दिवसांवर मकर संक्रांतीचा सण येऊन ठेपला आहे. देशभरात मकरसंक्रांतीचा हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Makar Sankranti 2024 : अवघ्या २ दिवसांवर मकर संक्रांतीचा सण येऊन ठेपला आहे. देशभरात मकरसंक्रांतीचा हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या सणाला फार मोठी परंपरा आहे. देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आणि विविध नावांनी हा सण साजरा केला जातो.

मकर संक्रांतीपूर्वी देशात लोहरी आणि भोगीचा उत्साह पहायला मिळत आहे. रविवारी (१४ जानेवारीला) देशात भोगी आणि लोहरीचा सण साजरा केला जाणार आहे. त्याची सध्या सर्वत्र लगबग पहायला मिळत आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी अंगणात सुरेख आणि आकर्षक रांगोळ्या काढल्या जातात. या रांगोळ्यांमुळे अंगणाला शोभा येते. आज आम्ही तुम्हाला खास मकर संक्रांतीनिमित्त रांगोळीच्या आकर्षक डिझाईन्सबद्दल सांगणार आहोत.

हळदी-कुंकू स्पेशल रांगोळी

मकर संक्रांतीच्या दिवशी महिला वाण लूटतात. या वाण लूटण्याला ही खास असे महत्व आहे. काही महिला मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. त्यासाठी खास रांगोळी देखील काढली जाते.

हळदी-कुंकू स्पेशल रांगोळी

तुम्ही सुद्धा या प्रकारची हळदी-कुंकू स्पेशल रांगोळी अंगणात काढू शकता. त्यासाठी तुम्हाला पट्टीची मदत घ्यावी लागेल. या पट्टीच्या मदतीने पतंग काढायला सोपे जाईल. त्यानंतर, पतंगाच्या डिझाईनला जोडून अर्धगोलाकार काढून तुम्ही फुलांची छान डिझाईन काढू शकता. त्यात आता मस्त रंगीबेरंगी रंग भरा आणि मधोमध हळदी-कुंकू लिहायला विसरू नका.

गोलाकार मकरसंक्रांती स्पेशल रांगोळी

मकर संक्रांतीसाठी जर तुम्हाला सिंपल आणि सोबर रांगोळी काढायची असेल तर ही रांगोळी एकदम परफेक्ट आहे. या प्रकारच्या रांगोळीत तुम्ही सिंपल गोल काढून त्यात तुमच्या आवडीप्रमाणे रंग भरू शकता.

गोलाकार रांगोळी

त्यानंतर, एका बाजूने छोटासा पतंग रेखाटून मधोमध मकर संक्रांती स्पेशल किंवा शुभ मकर संक्रांती असे रेखाटू शकता. जसे या रांगोळीमध्ये रेखाटण्यात आले आहे.

पतंग आणि तिळाच्या लाडूंची डिझाईन

मकर संक्रांत म्हटलं की तिळाचे लाडू आणि पतंग हे आलेच. पतंग आणि तिळाच्या लाडूंशिवाय आपली मकर संक्रांत ही अपूर्ण आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

पतंग आणि तिळाच्या लाडूंची डिझाईन

जर तुम्हाला तिळाचे लाडू आणि पतंग स्पेशल रांगोळी काढायची असेल तर तुम्ही या प्रकारची रांगोळी नक्कीच काढू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elephant Mahadevi Padayatra : 'महादेवी'साठी हजारो कोल्हापूरकर एकवटले, नेत्यांचा कितपत प्रतिसाद; फलकांनी वेधले लक्ष

Vasai Virar ED Raid : वसई विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि पत्नीला ईडीचे समन्स, ४ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Top Asian Student Cities: आशियामधील टॉप शिक्षण शहरे कोणती? पाहा संपूर्ण यादी!

Daibetes Management: मधुमेहाचे व्यवस्थापन करताना हृदय सुध्दा ठेवा निरोगी, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेले प्रभावी उपाय

अमृता सुभाष आणि अनिता दातेचा गाजलेला जारण सिनेमा होणार 'या' दिवशी ओटीटीवर रिलीज

SCROLL FOR NEXT