लाइफस्टाइल

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशी करा लहान मुलांचं बोरन्हाण, अशी करा तयारी

मकर संक्रांतीच्या दिवशी करा लहान मुलांचं बोरन्हाण...

Aishwarya Musale

नव्या वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रात. यावर्षी 15 जानेवारीला मकर संक्रांत आहे. महिलांसाठी हा सण महत्त्वाचा असतो. वेगवेगळ्या पद्धतीनं हा सण महिला साजरा करतात. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून वाण देण्याचीही पद्धत असते.

याशिवाय आणखी एक परंपराही असते. ती असते लहान मुलांसाठी. संक्रांती दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते. तर हे बोरन्हाण म्हणजे काय आणि कशासाठी ते केलं जातं याची माहिती तुम्हाला आहे का?

नवविवाहितेला जसं हलव्याचे दागिने घालण्यात येतात तसेच लहान मुलांनासुद्धा हलव्याचे दागिने घातले जातात. महिलांचा जसा हळदीकुंकवाचा कार्यक्रम असतो तसं लहान मुलांसाठी बोरन्हाण असतं. संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत हे कधीही करता येतं.

बोरन्हाण करण्यामागे शास्त्र आहे की, या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळं उदारणार्थ बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरुन टाकल्या जातात.

लहान मुलं इतरवेळी ती फळं दिली तर खात नाहीत. पण अशा खेळाच्या माध्यमातून ती वेचून खायला त्यांना आवडू शकते. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण आहे.

बोरन्हाण पद्धत

साधारण १ ते ५ वर्षांच्या मुलांचे बोरन्हाण केले जाते. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. यासाठी हलव्याचे दागिने घालून लहान मुलांना छान तयार केले जाते. पाटावर बसवून त्यांचे औक्षण केले जाते. बोरं, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्कीट, गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरुन ते टाकले जातात.

बाळाला या पदार्थांनी अंघोळ घातली जाते. त्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या लहान मुलांना ती बोरं, उसाचे तुकडे, शेंगा उचलून खाऊ द्यावेत किंवा घरी घेऊन जाण्यासाठी सांगावेत. बोरन्हाणमध्ये वापरण्यात येणारी फळं मुले इतर वेळी खात नाहीत म्हणून बोरन्हाणच्या माध्यमातून ती लहान मुलांच्या पोटात जावीत हा त्यामागचा हेतू असतो

प्रत्येक पिढीनुसार या बोरन्हाणच्या कार्यक्रमात त्यांना हवा तसा बदल होताना दिसतो. आता त्याचाही कार्यक्रम केला जातो. यामध्ये फळांच्याऐवजी चॉकलेट्स टाकली जातात. सजावट, दागिने इतर गोष्टी करण्याचा ट्रेंड सध्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vladimir Putin: रशियाचं पहिलं आण्विक क्षेपणास्त्र! मारा करण्याची अमर्याद क्षमता; कित्येक किलोमीटरपर्यंत होऊ शकतो विनाश

Latest Marathi News Updates : म्हाळसाकोरे शिवारातील दरोडा उघडकीस

प्रिया-उमेशच्या प्रेमाची गोष्ट उलगडणार गाण्यातून ! ‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला

आता तुम्ही UPI वरून पैसे मागू शकणार नाही, NPCI ची मोठी घोषणा, नव्या नियमामुळे होणार बदल

Walchandnagar Police Station : वालचंदनगर पोलिस ठाण्याला आयएसओ मानांकन; स्मार्ट पोलिस स्टेशन होण्याचा मिळाला बहुमान

SCROLL FOR NEXT