Child Sakal
लाइफस्टाइल

मुलांना सोशल बनवणे गरजेचे; पालकांनी करावे विशेष प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये एकलकोंडेपणा वाढत आहे. एकेकटी मुले स्मार्टफोन, टीव्ही, कॉम्प्यूटर यासारख्या गॅझेट्समध्ये अडकून पडताना दिसतात. असे असताना मुलांना सामाजिक जीवनात यश मिळावे यासाठी पालकांना विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी सर्वप्रथम मुलांना सोशल बनवणे गरजेचे ठरते.

सोशल मीडिया लाइफमध्ये स्मार्टफोन प्रत्येकासाठी महत्त्वाचा झाला आहे. मुलांना फोनवर गेम खेळण्याची आणि व्यंगचित्रे पाहण्याची देखील सवय मोठ्या प्रमाणात झाली आहे. परंतु, मुलांसाठी फोनचा अति वापर करणे खूप धोकादायक ठरू शकते. तुमची मुलं देखील अधिक वेळ स्मार्टफोनवर घालवत असतील तर वेळीच सावध होणे आवश्यक आहे.

मुलांना फोनपासून दूर ठेवणे खूप कठीण आहे. परंतु, आपण त्याच्यासाठी एक टाइम टेबल तयार करू शकता. असे केल्यास मुलं ठरावीक वेळच मोबाईल वापरतील. जेवताना, अभ्यास करताना मुलांना अजिबात फोन देऊ नका. काही मुले अशी असतात जी सतत मुलांमध्ये खेळताना, बागडताना दिसतात. म्हणजे त्यांना एकटे राहणे किंवा शांत बसणे जमतच नाही. काही मुले याउलट असतात आणि नेहमी एकटी दिसतात. अशी मुले एकटीच खेळतात. एकटीच बसून असतात. जणू त्यांना इतरांची गरज नसते. कदाचित त्यांना मित्र बनवायचे नसतात किंवा मित्र कसे बनवावे हे माहीत नसते.

मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमांना घेऊन जा

लोकांशी हसून बोलणे, हात मिळवणे, गप्पा मारणे, स्वत:ला आत्मविश्‍वासपूर्वक सादर करणे या गोष्टी मोठेपणी अत्यंत उपयोगी पडतात. म्हणूनच लहानपणापासूनच याची सवय लागली पाहिजे. त्यासाठी पालकांनी मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमांना नेले पाहिजे. कौटुंबिक स्नेहसंमेलनांना मुलांसह उपस्थित राहायला पाहिजे.

इतरांशी जुळवून घ्यायला शिकवा

सोशल होण्यासाठी मुलांना शालेय कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ द्या. मित्रमैत्रिणींसोबत रमू द्या. त्यांना शाळेच्या सहलींना पाठवा. भावंडांसोबत भटकंतीला पाठवा. यामुळे ती इतरांशी जुळवून घ्यायला शिकतील. आपल्याकडच्या वस्तू वाटायला शिकतील. त्यांना सहजीवन काय असते ते समजेल. भविष्यात त्यांना या सगळ्याचा लाभ होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT