Make onion oil in two ways for all hair problems kolhapur news 
लाइफस्टाइल

Hair tips : केसांच्या सर्व समस्यांसाठी दोन प्रकारे बनवा कांदा तेल

अर्चना बनगे

कोल्हापूर : केस गळतीच्या समस्यांनी त्रस्त असेल्यांना नेहमी कांद्याचा रस लावा असा सल्ला दिला जातो. परंतु, काही जणांना कांद्याच्या रसामुळे इन्फेक्शन होते. त्यामुळे अशा लोकांनी कांदा रस थेट न लावता यापासून तेल बनवून लावले तर कोणत्याही प्रकारची समस्या उद्धभवत नाही. चला तर मग आज आम्ही तुम्हाला कांद्याचे तेल कसे बनवायचे याबाबत माहिती देणार आहोत.  

काय आहे कांदा तेलाचे फायदे?

  • कांद्याच्या रसामुळे केस कोरडे पडत नाहीत.
  • काही दिवस याला स्टोर करून ठेवता येते.
  • केसांमध्ये संसर्ग असल्यास हे तेल खूप उपयुक्त ठरेल.
  • ज्यांना सल्फर सहन होत नाही त्यांच्यासाठी हे तेल चांगले आहे.

कांद्याचे तेल बनवण्याची कृती

मध्यम आकाराचा एक लाल आणि एक पांढरा कांदा घ्या. ३० चमचे द्राक्ष तेल घ्या. दोन्ही कांद्यांचे चिरून छोटे-छोटे तुकडे करा. द्राक्षांच्या दहा-पंधरा चमचे तेलासोबत याला मिक्सरमध्ये ब्लॅंड करून घ्या. आता हे मिश्रण एका कडईत काढून घ्या आणि पंधरा चमचे द्राक्ष तेल टाकून वीस ते पंचवीस मिनिट गरम करा. आता हे मिश्रण ठंड करा आणि त्यातून तेल फक्त वेगळे करा. हेच तेस तुमच्या केसांना लावायचे आहे. द्राक्षाचे तेल वापरणे शक्य नसल्यास नारळाचे तेलही वापरले तरी चालेले. 
 
कांद्याचे तेल बनविण्याची दुसरी पद्धत
मध्यम आकाराचा एक लाल आणि एक पांढरा कांडा घ्या. दोन कप नारळाचे तेल घ्या. आता कांदा कापून या आधी सांगितल्याप्रमाणे कृती करा. आता या कांद्याच्या तुकड्यांना एका कडईत घालून त्यात तेल टाकून तीस मिनिट गरम करा. त्यानंतर रात्रभर हे मिश्रण तसेच राहून द्या. कडईतून बाहेर काढायचे नाही. सकाळी कडईतून फक्त तेल वेगळे काढा. झाले तयार तुमचे कांद्याचे तेल.

किती दिवस हे तेल ठेवू शकता?

दोन्ही प्रकारचे तेल एक ते दोन महिने स्टोअर करून ठेवू शकता.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

प्रेक्षकांना कसा वाटला 'मी कात टाकली'चा पहिला एपिसोड? नेटकरी म्हणतात- मुख्य नायिकेचे डोळे बघूनच...

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

Marathi News Live Updates: गणेश विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबाराचा प्रकार; संजय गायकवाड यांनी कारवाईची केली मागणी

Maharashtra Drought Relief : दुष्काळी मदतीसाठी 'ई-पीक पाहणी' ठरणार जाचक? अट शिथिल करण्याची गरज; राज्यात 35.37 टक्के गटांची पाहणी

SCROLL FOR NEXT